मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड दोन कोटींच्या खंडणी प्रकरणात ‘सीआयडी’ला शरण गेला आहे. न्यायालयानं कराडला १५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मात्र, सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातही कराडचा हात असल्याचा आरोप होत आहे. तसेच, कराडला धनंजय मुंडेंचा सपोर्ट असून त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी होत आहे.
यातच मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मुंडेंचा संतोष देशमुख हत्या प्रकरणात कुठल्याही प्रकारचा संबंध नसावा, असं मत मांडलं आहे. ते कोरेगाव भीमा येथे अभिवादन केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
हेही वाचा : मराठी माणूस हा केवळ…, नव्या वर्षाच्या शुभेच्छा देत ठाकरेंनी व्यक्त केली खंत
भरणे म्हणाले, “वाल्मिक कराड शरण गेले आहेत. दोषी असतील, तर त्यांच्यावर 100 टक्के कारवाई होणार आहे. पंकजाताई आणि धनंजय मुंडे हे आमचे नेते आहेत. मित्र आणि कार्यकर्ता प्रत्येकाला असतो.”
“एखाद्या कार्यकर्त्यानं किंवा मित्रानं गुन्हा केला, तर वरील नेत्याचा संबंध नसतो. तपासातून सर्व समोर येणार आहे. पण, धनंजय मुंडेंचा देशमुख हत्या कांडाशी कुठल्याही प्रकारचा संबंध नसावा, हे मला वाटते,” असं भरणे यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा : केजच्या न्यायालयात रात्री काय घडले? 30 मिनिटे सुरू होता युक्तिवाद