घरताज्या घडामोडीदावोसची गुंतवणूक म्हणजे शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करणाऱ्यांना मोठी चपराक - प्रवीण दरेकर

दावोसची गुंतवणूक म्हणजे शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करणाऱ्यांना मोठी चपराक – प्रवीण दरेकर

Subscribe

स्विर्त्झलँडमधील दावोस येथे भरलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्राने स्वतःचा ठसा उमटवत विविध कंपन्यांसोबत १ लाख ३७ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार केले. ही उद्योग क्षेत्राने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर दाखवलेल्या विश्वासाची पावती आहे. दावोसची गुंतवणूक म्हणजे आमच्या शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करणाऱ्यांना एक मोठी चपराक आहे, असा टोला भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना लगावला.

मुंबई : स्विर्त्झलँडमधील दावोस येथे भरलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्राने स्वतःचा ठसा उमटवत विविध कंपन्यांसोबत १ लाख ३७ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार केले. ही उद्योग क्षेत्राने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर दाखवलेल्या विश्वासाची पावती आहे. दावोसची गुंतवणूक म्हणजे आमच्या शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करणाऱ्यांना एक मोठी चपराक आहे, असा टोला भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना लगावला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रदेश सचिव अखिलेश चौबे, माध्यम प्रमुख नवनाथ बन, प्रवक्ते आसिफ भामला उपस्थित होते. (Davos investment is a big slap in the face for critics of Shinde Fadnavis government Pravin Darekar)

“आज महाराष्ट्राच्या आणि गुंतवणुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा दिवस आहे. महाराष्ट्रातील जनतेसमोर शिंदे-फडणवीस सरकारच्या माध्यमातून दावोस या ठिकाणी जे काही करार झाले यामुळे महाराष्ट्रातील उद्योग धंद्यांना चालना मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दावोस या ठिकाणी साधारणतः १ लाख ३७ हजार कोटींचे सामंजस्य करार केले आहेत. १ लाखाहून अधिक रोजगारनिर्मिती या निमित्ताने होणार आहे”, असे प्रवीण दरेकर यांनी म्हटले. यावेळी आमदार दरेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दावोस येथे केलेल्या सामंजस्य कराराची माहितीही दिली.

- Advertisement -

“या गुंतवणुकीमुळे आदित्य ठाकरे-उद्धव ठाकरे या आमच्या शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करणाऱ्यांना एक मोठी चपराक मिळाली आहे. अडीच वर्षाच्या कालावधीत महाराष्ट्रात काय गुंतवणूक आली, महाराष्ट्राचा औद्योगिक क्षेत्रात काय विकास झाला हे आपण पाहिले. खरे म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी दावोसला गेले पाहिजे होते. परंतु चिरंजीवांना पर्यटनाला, सहलीला पाठवले. एक कवडीची गुंतवणूक आली नाही. एक उद्योग आला नाही”, असा टोलाही दरेकरांनी ठाकरे यांना लगावला.

टीका-टिपण्णी करणाऱ्यांनी दावोसच्या अशा प्रकारच्या मुख्यमंत्र्यांच्या-उपमुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नानंतर चार कौतुकाचे बोल अपेक्षित होते. परंतु ते दूर राहिले उलट गुजरातला जायला पाहिजे होते, अशा प्रकारची कोटी संजय राऊत करतात. संजय राऊत यांनी आपल्या कोत्या मनोवृत्तीचे, द्वेष भावनेच्या मनोवृत्तीचे प्रदर्शन पुन्हा एकदा दाखवून दिल्याची टीका दरेकर यांनी यावेळी केली.

- Advertisement -

“एखाद्या राज्यात गुंतवणूक यायची असेल तर स्थिर सरकार असण्याची भावना निर्माण होण्याची गरज आहे. गुंतवणूकदारांच्या मनात आत्मविश्वास निर्माण करावा लागतो. तेव्हाच गुंतवणुकीचा ओघ येतो. गुंतवणुकीच्या माध्यमातून स्थिर सरकार महाराष्ट्राला लाभणार आहे व गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर येणार आहे. त्यामुळे कोल्हेकुई करणाऱ्यांना चांगलीच मोठी चपराक शिंदे-फडणवीस सरकारच्या माध्यमातून दिली गेली आहे. आम्ही केवळ बोलत नाही कृतीतुन दिसून येते. सहा महिन्याच्या काळात महाराष्ट्राला प्रगतीकडे नेले जात आहे. यावर महाराष्ट्रातील तमाम जनतेचा विश्वास आहे. मुंबईला जी-२० च्या माध्यमातून कायापालट करण्याची केवळ घोषणा केली नाही तर बदललेली मुंबई आपण पाहतोय. म्हणून हे सर्व करार निश्चित वेळेत कार्यान्वित होतील. फॉक्सकॉनच्या माध्यमातून कोल्हेकुई केली जात होती त्याला उत्तर प्रत्यक्ष कृतीच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हे सरकार देईल आणि येणाऱ्या काळात ते दिसूनही येईल”, असेही दरेकर यांनी सांगितले.


हेही वाचा – मतं फोडण्याचं काम भाजपचं, सत्यजित तांबेंच्या बंडखोरीवर अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -