घरदेश-विदेशदाऊद आणि त्याच्या पत्नीला पाकिस्तानमध्ये करोनाची लागण

दाऊद आणि त्याच्या पत्नीला पाकिस्तानमध्ये करोनाची लागण

Subscribe

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला करोनाची लागण झाल्याचे सीएनएनच्या न्यूज १८च्या वृत्तानुसार समोर आले आहे. दाऊदची पत्नी महजबीन हिला देखील करोनाचा संसर्ग झाल्याचे पाकिस्तानमधील सरकारी अधिकार्‍यांच्या हवाल्याने सांगण्यात येते आहे.

त्यामुळे दाऊद आणि पत्नी महजबीन हिला कराचीमधील लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच त्याच्या घरातील सुरक्षारक्षक आणि कर्मचार्‍यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. मागील वर्षी पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने ब्रिटनमधील एका न्यायालयाला दाऊद इब्राहिम सध्या पाकिस्तानात नसल्याची माहिती दिली होती.

- Advertisement -

पण आता सीएनएनच्या वृत्तानुसार दाऊदला करोनाची लागण झाल्यामुळे त्याच्यावर कराचीमधील लष्करी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता पाकिस्तानचा खोटारडेपण उघडकीस आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -