Eco friendly bappa Competition
घर क्राइम Dawood Ibrahim : समीर वानखडेला जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत तक्रार, CBI म्हणते...

Dawood Ibrahim : समीर वानखडेला जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत तक्रार, CBI म्हणते गुन्हा योग्य

Subscribe

 

मुंबईः डॉन Dawood Ibrahim च्या नावाने आपल्याला जीवे मारण्याची धमकी येत आहे, अशी तक्रार आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांनी पोलिसांत केली आहे. मला आणि माझ्या कुटुंबीयांना काही धोका झाल्यास जबाबदार कोण, असा सवाल वानखेडेने केला आहे. खोट्या ट्विटर अकाऊंटवरून धमकी येत असल्याचा दावा समीर वानखेडे यांनी केला आहे.

- Advertisement -

समीर वानखेडे विरोधात नोंदवलेला गुन्हा योग्य आहे. या गुन्ह्याविरोधात समीर वानखेडे यांनी केलेली याचिका फेटाळून लावावी, असे प्रतिज्ञापत्र Central Bureau of Investigation (CBI) ने मुंबई उच्च न्यायालयात केले आहे. त्यामुळे समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

समीर वानखेडेची याचिका

दिल्लीत सीबीआयने नोंदवलेला गुन्हा रद्द करावा. या गुन्ह्याचे आरोपपत्र दाखल करु नये. सीबीआय तपासाला स्थगिती द्यावी. मला अटक न करण्याचे आदेश सीबीआयला द्यावेत, अशी मागणी समीर वानखेडेने याचिकेत केली आहे. या याचिकेत केंद्रीय गृहमंत्रालय, CBI, NCB व महाराष्ट्र शासनाला प्रतिवादी करण्यात आले आहे.

- Advertisement -

 

CBI चा दावा

cruise drugs प्रकरणातून अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला सोडण्यासाठी तत्कालीन NCB अधिकारी समीर वानखेडेंनी २५ कोटींची लाच मागितली असा आरोप करत CBI ने गुन्हा नोंदवला. समीर वानखेडेंच्या घरावरही छापा टाकण्यात आला. CBI ने चौकशीसाठी समीर वानखेडेंना समन्सही जारी केले होते.

पाच तास CBI चौकशी

समीर वानखेडे यांची गेल्या रविवारी CBI ने  पाच तास चौकशी केली. चौकशी संपल्यानंतर समीर वानखेडे यांनी वंदे मातरम्, अशी प्रतिक्रिया दिली. त्यानंतर न्यायालयाने समीर वानखेडे यांना अटक न करण्याचे अंतरिम आदेशही दिले. त्यामुळे त्यांना अद्याप सीबीआयने अटक केलेली नाही.

 

क्रांती रेडकरचा पतीला पाठिंबा

क्रांती रेडकर हिने सोशल मीडियावर तिचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने कोणाचंही नाव न घेता तिच्या नवऱ्याविरुद्ध होणाऱ्या कारवाईंबद्दल भाष्य केलं आहे. क्रांतीने अतिशय मार्मिकपणे तिचे मत या व्हिडीओच्या माध्यामातून मांडलं आहे. खरंतर क्रांतीने या व्हिडीओत सत्याचा खरा अर्थ काय हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. ती या व्हिडीओत म्हणाली आहे की, मूर्ख बनवण्याच्या दोन पद्धती आहेत. एक म्हणजे जे खर नाही त्यावर विश्वास ठेवणं आणि दुसरं म्हणजे सत्य काय आहे यावर विश्वास ठेवण्यास नकार देणं. पुन्हा ऐका, समजून घ्या, मूर्ख बनू नका, त्याचबरोबर क्रांती रेडकर हिने या व्हिडीओला कॅप्शनही दिलं आहे, ती लिहिते की, The Truth Shines like no Diamond Ever. अशी पोस्ट शेअर करत तिने आपल्या नवऱ्याला पाठिंबा दर्शवला आहे.

 

शाहरुखला समीर वानखेडेने दिले होते ‘हे’ उत्तर

प्रिय शाहरुख, ड्र्ग्ज् प्रकरणात ज्या नवीन गोष्टी समोर येत आहेत. त्याने मलाही त्रास होतो आहे. कोणालाही आनंद होत नाही. आर्यनला याप्रकरणात जाणीवपूर्वक अडकवण्याचा आमचा कोणताच हेतू नाही. कायद्यात काही तांत्रिक तरतुदी आहेत. तरी कोणीही कितीही प्रयत्न केला तरी कोणत्याही मुर्ख माणसाला आर्यनच्या केसची वाट लावू देणार नाही. माझं तुला एकच म्हणणं आहे की संयम ठेव. हे सर्व लवकरच संपणार आहे, असं शाहरुखच्या विनवणीला समीर वानखेडेने उत्तर दिलं होत. मी मुलांकडे पुनर्वसनाच्या दृष्टीकोनातून बघतो. मुलांना नवीन आयुष्य जगण्याची व देशाची सेवा करण्याची संधी मिळावी, हा माझा हेतू आहे. पण काही लोकं त्यांचा काहीही संबंध नसताना माझ्या हेतूला अपमानित करत आहेत, असंही समीर वानखेडेने शाहरुखला सांगितलं होतं. हे संभाषण समीर वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेला जोडले होते.

 

- Advertisment -