घरताज्या घडामोडीमुंबईत डी कंपनीच्या शार्प शूटर आणि तस्करांच्या 20 ठिकाणावर एनआयएचे छापे

मुंबईत डी कंपनीच्या शार्प शूटर आणि तस्करांच्या 20 ठिकाणावर एनआयएचे छापे

Subscribe

कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिमच्या साथीदारांच्या ठिकाण्यांवर छापेमारी करण्यात आली. राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएने ही छापेमारी केली आहे. दाऊदच्या टोळीतील गुंडांच्या 20 हून अधिक ठिकाण्यांवर धाड टाकण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिमच्या साथीदारांच्या ठिकाण्यांवर छापेमारी करण्यात आली. राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएने ही छापेमारी केली आहे. दाऊदच्या टोळीतील गुंडांच्या 20 हून अधिक ठिकाण्यांवर धाड टाकण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. ही 20 ठिकाणे दाऊदचे शार्प शूटर, तस्कर, डी-कंपनीचे रिअल इस्टेट मॅनेजर यांच्याशी जोडलेली आहेत.

एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, एनआयएने बोरिवली, सांताक्रूझ, वांद्रे, नागपाडा, गोरेगाव, परळ येथील 20 ठिकाणी छापे टाकले आहेत. गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार, एनआयएने दाऊद इब्राहिम, डी कंपनीविरोधात गुन्हा दाखल केला होता, ज्यावर ही चौकशी आणि छापेमारी सुरू आहे. डी कंपनी ही संयुक्त राष्ट्रांनी (UN) प्रतिबंधित दहशतवादी संघटना आहे. 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊदला 2003 मध्ये यूएनने जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केले होते. त्याच्यावर २५ दशलक्ष बक्षीसही ठेवण्यात आले होते.

- Advertisement -

गृह मंत्रालयाने फेब्रुवारी २०२२ मध्ये दाऊद इब्राहिमशी संबंधित प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवला होता. राष्ट्रीय तपास संस्था ही देशातील सर्वात मोठी दहशतवादी तपास संस्था आहे. याआधी ईडी दाऊदशी संबंधित प्रकरणांची चौकशी करत होती. गृह मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, डी कंपनी आणि दाऊद इब्राहिम टेरर फंडिंग, नार्को टेरर, ड्रग्स स्मगलिंग आणि फेक करन्सी (एफआयसीएन) मध्ये व्यापार करून भारतात दहशत पसरवण्याचे काम करत आहेत. एवढेच नाही तर दाऊद इब्राहिम आणि त्याची डी कंपनी लष्कर-ए-तैयबा (एलईटी), जैश-ए-मोहम्मद (जेएम) आणि अल कायदाच्या माध्यमातून भारतात दहशतवादी कारवाया करत आहेत. या यादीत छोटा शकील, जावेद चिकना, टायगर मेमन यांचाही समावेश आहे

एनआयए केवळ दाऊद इब्राहिम आणि त्याच्या डी कंपनीच्या दहशतवादी कारवायांचा तपास करणार नसून, अंडरवर्ल्ड डॉनचे गुंड छोटा शकील, जावेद चिकना, टायगर मेनन, इक्बाल मिर्ची (मृत), दाऊदची बहीण हसिना पारकर (मृत) यांच्याशी संबंधित दहशतवादी कारवायांचाही तपास करणार आहे. सध्या दाऊद इब्राहिम पाकिस्तानात लपून बसला असून कराचीच्या पॉश भागात आपले लपण्याचे ठिकाण बदलत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – राणा दाम्पत्याला मिडीयाला बाईट देणं पडणार महाग, जामीन होणार रद्द

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -