घरमहाराष्ट्रदाऊदच्या आणखी एका मालमत्तेचा लिलाव; १.१० कोटीच्या बोलीवर खरेदी

दाऊदच्या आणखी एका मालमत्तेचा लिलाव; १.१० कोटीच्या बोलीवर खरेदी

Subscribe

१० नोव्हेंबरच्या लिलाव प्रक्रियेत दाऊदच्या ७ पैकी ६ जागांचा लिलाव झाला

कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या आणखी एका संपत्तीचा मंगळवारी लिलाव करण्यात आला आहे. रत्नागिरीतील खेड तालुक्यातील लोटे येथील दाऊदच्या मालमत्तेचा अखेर लिलाव झाला आहे. लोटे गावातील स्थानिक ग्रामस्थ रवींद्र काते यांनी सर्वाधिक बोली लावून ही जमीन खरेदी केली आहे. रवींद्र काते यांनी १ कोटी १० लाख इतक्या किमतीला मालमत्ता विकत घेतली आहे. SAFEMA ने या लिलावाचे ऑनलाईन आयोजन केले होते. यामध्ये रवींद्र काते यांनी तो जिंकला असल्याची माहिती मिळतेय.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी स्लगलिंग आणि फॉरेन एक्सचेंज मँनिप्युलेट आणि केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी या जागेची पाहणी केली होती. त्यावेळी लोटे इथल्या जागेची किंमत १ कोटी ९ लाखांच्या घरात निश्चित करण्यात आली होती. तर १० नोव्हेंबरच्या लिलाव प्रक्रियेत दाऊदच्या ७ पैकी ६ जागांचा लिलाव झाला होता. यासह लोटेतील मालमत्तेचा लिलाव मागे घेण्यात आला होता. मात्र त्या जागेचा लिलाव १ डिसेंबर रोजी करण्यात आला.

- Advertisement -

यापूर्वी दिल्लीच्या दोन वकिलांनी दाऊदच्या सहा मालमत्ता घेतल्या होत्या. यामधून सरकारला २२ लाख ७९ हजार ६०० रुपये मिळाले आहेत. वकील अजय श्रीवास्तव यांनी दाऊदच्या दोन मालमत्ता तर वकील भूपेंद्र भारद्वाज यांनी सहा मालमत्ता घेतल्या होत्या. तर दाऊदची रत्नागिरीतील हवेली अवघ्या ११ लाख २० हजार रुपयांना विकण्यात आली होती. सेफमा अर्थात स्मगलर्स अँड फॉरेन एक्सचेंज मॅनिपुलेटर्स एजन्सीकडून हा लिलाव झाला होता.

एकूण सहा मालमत्तांचा लिलाव कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम कासकर याचे मूळ गाव हे खेड तालुक्यातील मुंबके आहे. या गावात त्याचा बंगला होता, तर आंब्याची बाग असून लोटे आणि खेड शहर अशा सहा ठिकाणी त्याच्या वेगवेगळ्या मालमत्ता होत्या. केंद्र सरकारने या मालमत्ता ताब्यात घेऊन त्या मालमत्तेचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला. साफेमानुसार, (स्मगलर्स फॉरेन एक्स्चेंज मॅनिपुलेटर अ‍ॅक्ट) एकूण १७ मालमत्तांचा लिलाव करण्यात आला आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -