घरताज्या घडामोडीअजित पवारांकडे अर्थ आणि आदित्य ठाकरेंना उच्च व तंत्रशिक्षण?

अजित पवारांकडे अर्थ आणि आदित्य ठाकरेंना उच्च व तंत्रशिक्षण?

Subscribe

महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या खातेवाटपाला गुरुवारी देखील मुहूर्त मिळाला नसला तरी संभाव्य खातेवाटपात राज्याच्या आर्थिक नाड्या राष्ट्रवादीच्या हातात जाणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. यात प्रामुख्याने राज्याचे नवे उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे अर्थ आणि वित्त विभागाची जबाबदारी सोपविण्यात येणार असून जयंत पाटील यांच्या खांद्यावर जलसंपदा विभागची धुरा टाकण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, खातेवाटप शुक्रवारी जाहीर होईल, असे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी जाहीर केल्याने उभ्या महाराष्ट्राला खातेवाटपासाठी आणखीन एक दिवसाची वाट पाहावी लागणार आहे.

ठाकरे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार मागील महिन्यात ३० डिसेंबर रोजी पूर्ण करण्यात आल्यानंतर सर्वांचे लक्ष खातेवाटपाकडे लागून राहिले आहे. त्यानुसार बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भात भाष्य करताना खातेवाटप गुरुवारी जाहीर होण्याची शक्यता वर्तविल्यानंतर सर्वांचे लक्ष्य गुरुवारी मंत्रालयावर लागून राहिले होते. मात्र अद्याप काही पदांवर एकमत झालेले नसल्याने गुरुवारची घोषणा आता शुक्रवारी होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

- Advertisement -

दरम्यान, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या संभाव्य खातेवाटपावर नजर टाकली असता राज्याच्या शिक्षण विभागाची जबाबदारी अमित देशमुख यांच्यावर सोपविण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. तर बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल विभाग तर अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकांम विभागाची जबाबदारी देण्यात येईल, अशी चर्चा मंत्रालयात दिवसभर सुरु होती. त्याशिवाय राष्ट्रवादीच्या गोटात अजित पवारांकडे वित्त विभागाची जबाबदारी देण्यात येणार आहे. त्याशिवाय जितेंद्र आव्हाड यांचे नाव गृहनिर्माण खात्यासाठी चर्चेत असून नवाब मलिक यांच्याकडे अल्पसंख्याक विभाग सोपविण्यात येईल, तर शरद पवार यांचे विश्वासू मानले जाणारे हसन मुश्रीफ यांच्याकडे सहकार विभागाची जबाबदारी सोपविण्यात येईल, अशी माहिती राष्ट्रवादीतील एका सूत्रांकडून देण्यात आली आहे. त्याशिवाय धनजंय मुंड यांच्याकडे सामाजिक न्याय हे विभाग दिला जावू शकते.

तर शिवसेनेकडून आदित्य ठाकरे यांना कोणते खाते दिले जाते, याकडे उभ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून् राहिले आहे. शिवसेनेकडून आदित्य ठाकरे यांच्याकडे पर्यावरण किंवा उच्च व तंत्र शिक्षण विभागाची जबाबदारी दिली जावू शकते, असे माहिती पुढे आली आहे. तर त्याशिवाय एखादे मोठे खाते त्यांच्याकडे सोपविण्यासंदर्भात ही शिवसेनेचे अनेक नेते आग्रही असल्याने त्यासंदर्भात देखील चाचपणी सुरु असल्याचे बोलले जात आहे. त्याशिवाय एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास तर सुभाष देसाई यांच्याकडे उद्योग विभाग पुन्हा एकदा सोपविला जावू शकतो. तर नव्याने संधी देण्यात आलेले उदय सामंत यांच्याकडे परिवहन विभागाची जबाबदारी देण्यात येईल, अशी चर्चा गुरुवारी मंत्रालयात सुरु झाली आहे.

- Advertisement -

अजित पवारांची कामाला सुरुवात

मंत्रीमंडळात विस्तारात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मंत्रपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी लगचेच कामाला सुरुवात केली होती. गेल्या काही दिवसांपासून ते मंत्रालयातील पहिल्या मजल्यावरील दालनात बसून काम करत असून गुरुवारी ही त्यांनी अनेक बैठका आयोजित केल्या होत्या. यात प्रामुख्याने अर्थ विभागाच्या बैठका घेण्यात आला असून शेतकरी कर्जमाफी बाबत त्यांनी आढावा घेतल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे अजित पवार यांच्याकडेच अर्थ विभागाची जबाबदारी सोपविण्यात येईल, हे निश्चित मानले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -