घरताज्या घडामोडीआदित्य ठाकरेंच्या 'या' प्रश्नाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चोख प्रत्युत्तर

आदित्य ठाकरेंच्या ‘या’ प्रश्नाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चोख प्रत्युत्तर

Subscribe

विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज पाचवा दिवस आहे. अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी शिवसेना आमदार आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी ओबीसी आरक्षणा संदर्भातील मुद्दा उपस्थित केला.

विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज पाचवा दिवस आहे. अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी शिवसेना आमदार आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी ओबीसी आरक्षणा संदर्भातील मुद्दा उपस्थित केला. ‘सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणांसंबंधी 22 तारखेला मिळाल्या असून त्यासाठी निवडणुकींना पाच आठवड्यांची स्थगिती दिली आहे’, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले. तसेच, राज्य सरकारला एवढी घाई का आहे, असा सवाल उपस्थि करत, सरकार घटनाबाह्य आहे, असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले. “निवडणुका घेण्यासाठी कोणतीही स्थगिती नसून ती केवळ 92 नगरपालिकांच्या संबंधित सरकारने दाखल केलेल्या याचिकेसंबंधी आहे. (dcm devendra fadanvis answer on shiv sena leader aditya thackeray question on obc reservation and election)

अधिवेशनात आदित्य ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित सरकारला सवाल विचारले. “सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणांसंबंधी 22 तारखेला मिळाल्या असून त्यासाठी निवडणुकींना पाच आठवड्यांची स्थगिती दिली आहे. पण राज्य सरकारला एवढी घाई का आहे? सरकार घटनाबाह्य आहे, पण सगळ्याच गोष्टी घटनाबाह्य करायच्या आहेत का? सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश असताना उद्याच निवडणूक असल्यासारखं यासंबंधी घाई करुन विधेयक पारित का केले जातंय, असे सवाल उपस्थित करत आदित्य ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडले.

- Advertisement -

आदित्य ठाकरे यांच्या प्रश्नानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. “ओबीसी आरक्षणाच्या प्रकरणामध्ये ज्या ग्रामपंचायची आणि नगरपालिकांना आरक्षणातून वगळण्यात आले आहे, त्यांनाही आरक्षण लागू करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने अहवाल दाखल केला आहे. त्यामध्ये ज्या 200 ग्रामपंचायची आणि 94 नगपालिकांच्या निवडणुका आधी जाहीर झाल्या होत्या, त्यांना आरक्षण देण्यात आले नाही. त्यांच्या अध्यक्षांसाठी ओबीसी आरक्षण लागू केले आहे. पण त्यांच्या सदस्यांसाठी हे आरक्षण जाहीर करण्यात आले नाही. या संबंधी राज्य सरकारने वेगळी याचिका दाखल केली आहे. या ग्रामपंचायती आणि नगरपालिकांनाही आरक्षण लागू व्हावे अशी मागणी केली आहे. आता यावर निर्णय करण्यासाठी आपल्याकडे वेळ नाही, त्यासाठी पाच आठवड्यांची स्थगिती देतो, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं. पण केवळ याच संबंधी ही स्थगिती आहे, इतर सर्व निवडणुकांना कोणतीही स्थगिती दिली नाही”, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.


हेही वाचा – उपमुख्यमंत्री साहेब गोलमाल उत्तर देऊ नका; विधानसभेतच आमदार सुहास कांदे फडणवीसांवर भडकले

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -