घरमहाराष्ट्रआव्हाडांना काही तरी केल्याचा दिखावा करण्याचा नाद; फडणवीसांचा टोला

आव्हाडांना काही तरी केल्याचा दिखावा करण्याचा नाद; फडणवीसांचा टोला

Subscribe

खूप काही तरी केल्याचा दिखावा करण्याचा आव्हाडांना नाद, या नादातून असे प्रकार होतात असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. आव्हाडांना जामीन मिळाल्यानंतर उपमुख्यमंत्री फडणवीसांनी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

जितेंद्र आव्हाडांची 15 हजारांच्या जातमुचलक्यावर न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. तसेच तपासाला सहकार्य करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, एखाद्या गोष्टीचा कांगावा करणं ही जितेंद्र आव्हाडांची स्टाइल आहे. कुठल्याही गोष्टीते उद्दातीकरण करण्याचा आव्हाड प्रयत्न करतात, त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह थिएटरमध्ये जाऊन जो तमाशा केला, मारहाण केली, त्यामुळे ही कारवाई झाली. कोणीही असे केले असते, तर असेच झाले असते, खूप काही तरी केल्याचा दिखावा करण्याचा आव्हाडांना नाद आहे. या नादातून असे प्रकार होतात, अशी टीकाही फडणवीसांनी केली आहे.

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह 100 कार्यकर्त्यांनी विवियन मॉलमध्ये 7 नोव्हेंबर रोजी ‘हर हर महादेव’ या चित्रपटाचा शो बंद पाडला. तसेत चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांनाही मारहाण केली. त्यामुळे आव्हाडांसह बारा कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली होती. यानंतर आज आव्हाडांची जामीनावर सुटका झाली.

अफजल खानाच्या कबरीजवळील अतिक्रमण कारवाईबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, ,निश्चितपणे आता पुन्हा तिथे अतिक्रमण होणार नाही, असा प्रयत्न केला जाईल. कुठलेही अतिक्रमण असेल, ते तिथून काढले जाईल. पूर्ण गुजरात मोदींच्या पाठिमागे आहे. तिथे त्यांना अभूतपूर्व विजय मिळेल. पक्षाने जी जबाबदारी दिली आहे, ते काम करू. त्याचा आनंद आहे, असे सांगायलाही ते विसरले नाहीत.


हेही वाचा : आम्ही काहीही करू शकतो हे दाखवण्यासाठी मला अटक; जामीनानंतर आव्हाडांची पहिली प्रतिक्रिया


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -