पीएफआय ही सायलंट किलर म्हणत फडणवीसांची ‘या’ सहा संघटनांवरही बंदी घालण्याची मागणी

dcm Devendra Fadnavis

देशाची अखंडता, सार्वभौमत्व आणि कायदा सुव्यवस्था धोक्यात घालणाऱ्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संस्थेवर केंद्र सरकारने बंदी घातली. या बंदीच्या निर्णयाचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत केले आहे. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानले आहेत. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही केंद्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत करत महाराष्ट्रातही या संघटनेवर बंदी घातली जाणार असल्याचे म्हणत त्यासोबतच्य संलग्न 6 संघटनांवर बंदीची कारवाई करण्याची मागणी केली आहे.

पीएफआय संघटनेवर सर्वप्रथम केरळ सरकारने बंदी घातली. पीएफआयच्या माध्यमातून समाजात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा सातत्याने प्रयत्न होत होता. काही दिवसांपासून महाराष्ट्रातल्या नॉर्थईस्ट भागात कुठेतरी मशिदी फोडल्याने वातावरण संतप्त करण्यात आले, त्यातून अमरावतीमध्ये मोर्चे काढण्यात आले, तोडफोड करण्यात आली होती. ज्याचा कुठलाही संबंध मशिदी तोडल्याशी नव्हता. त्याचे क्रिएटीव्ह हे बांग्लादेशचे होते, जे वेगवेगळ्या देशातले होते, अशी कृत्ये पीएफआयच्या माध्यमातून सुरु होते.

पीएफआयद्वारे फडींगचे मॉडेल्स तयार करण्यात आले होते. ही संघटना खूप अकाऊंट्स ओपन करत त्या अकाऊंटमधून थोडे थोडे पैसे आणायचे म्हणजे कोणाच्याही लक्षातही येणार नाही. या सगळ्या गोष्टीचे पुरावे उपलब्ध आहेत. म्हणून केंद्र सरकारने या संघटनेवर बंदी घातली असावी. महाराष्ट्रातही संघटनेविरोधात आम्ही सक्षम कारवाई करू, तसेच त्यांच्याशी संबंधित 6 संघटनांवरही बंदी घालण्याची कारवाई करण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

पीएफआय संघटना एक सायलेंट किलर होती. ज्यावेळी त्यांच्या लक्षात आले की आपली आर्मी आणि इंटेलिजन्स अलर्ट झालं आहे त्यावेळी संघटनेने थेट दहशतवादी हल्ला करणं किंवा बॉम्बस्फोट करणं, याऐवजी वेगळ्यापद्धतीने समोर येत, एक मानवी चेहरा दाखवून पाठीमागून हवे ते कृत्ये करायचे असे काम या देशविघातक शक्तींनी सुरु केल्याचे फडणवीस म्हणाले.


… मग घ्या ना धौती योग; आशिष शेलारांची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका