टक्केवारीसाठी प्रकल्प अडवून ठेवले तर आता खैर नाही; देवेंद्र फडणवीसांचा इशारा

dcm devendra fadanvis slams mahavikas aghadi govt and thackeray over projects percentages

राज्यातील महापालिकेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत, यावरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहे. आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकास कामातील टक्केवारीवरून महाविकास आघाडी सरकारला अप्रत्यक्ष टोला लगावत अधिकाऱ्यांना इशारा दिला आहे. चांगली टेक्नॉलॉजी असली पाहिजे त्या बाबतची माहिती काढली पाहिजे. कारण अनेक प्रकल्प चुकीच्या कामामुळे फसले आहेत म्हणत फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारला टोला लगावला आहे. तसेच टक्केवारीसाठी प्रकल्प अडवून ठेवले तर ते आता खपवून घेतले जाणार नाहीत, अस म्हणत फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सज्जड इशारा दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज मुंबईत स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी 2.0 चा शुभारंभ पार पडला. यावेळी फडणवीस बोलत होते.

टेक्नॉलॉजी कोण डोक्यावर मारत आहे असे व्हायला नको यासाठी पारदर्शकता असली पाहिजे. चांगल्यात चांगली माणसे कशी येतील, नाहीतर एका माणसासाठी चांगली माणसे बाहेर काढणं असे व्हायला नको. चांगली टेक्नॉलॉजी पाहिजे त्या बाबतची माहिती काढली पाहिजे कारण अनेक प्रकल्प चुकीच्या कामामुळे फासले आहेत. टक्केवारीसाठी प्रकल्प अडवून ठेवले तर ते आता खपवून घेतले जाणार नाहीत. अशा शब्दात फडणवीसांनी मागील सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढत अधिकाऱ्यांना इशारा दिला आहे.

चांगल्या कामापेक्षा आम्हाला कोणतीही अपेक्षा नाही. येत्या काळात महाराष्ट्र स्वच्छ भारत अभियानात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असेल, असा विश्वासही फडणवीसांनी यावेळी व्यक्त केला.


बारामती हवीशी वाटत असल्यास भाजप लॉन्ड्रीचं स्वागतच…,खासदार सुळेंची भाजपच्या बावनकुळेंवर टीका