Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी Devendra Fadnavis : परदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्रच अव्वल, फडणवीसांचा मोठा दावा

Devendra Fadnavis : परदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्रच अव्वल, फडणवीसांचा मोठा दावा

Subscribe

राज्य सरकारकडून दोन बड्या कंपन्यांसोबत करार करण्यात आला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत आज माहिती दिली आहे. परदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्रच अव्वल असल्याचा दावा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी करत आता विरोधकांनी तोंडं बंद केली पाहिजेत, अशा शब्दांत देखील त्यांनी टीका केली आहे.

30 हजारांपेक्षा जास्त लोकांना रोजगार मिळणार 

आज महाराष्ट्रात पंप स्टोरेज प्रोजेक्टच्या संदर्भात 13 हजार 500 मेगावॅटचे करार केंद्र सरकारची एनएचपीसी आणि खासगी क्षेत्रातील टॉरेंट पॉवर या दोन कंपन्यांशी केले आहेत. जवळपास 71 हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे आणि 30 हजारांपेक्षा जास्त लोकांना रोजगार मिळणार असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.

पंप स्टोरेज ही अत्यंत महत्वाची व्यवस्था

- Advertisement -

जगभरात रिन्युएबल एनर्जी क्षेत्रात पंप स्टोरेज ही अत्यंत महत्वाची व्यवस्था आहे. ज्यामध्ये खालच्या जलाशयातून दिवसा सोलरच्या माध्यमातून पाणी उचललं जातं आणि वरच्या जलाशयात सोडलं जातं. रात्री वरच्या जलाशयातून ते पाणी खाली आणून टर्बाइनच्या माध्यमातून विजनिर्मिती केली जाते. यामुळे 24 तास आपल्याला पारंपारिक उर्जा कमी किंमतीत मिळते. ग्रीड स्टॅबिलाइज करण्यासाठी ही वीज एका मिनिटांत सुरू करता येते आणि आवश्यकता नसल्यास ती लगेच बॅकडाऊन देखील करता येते, असेही फडणवीस म्हणाले.

महाराष्ट्राला नंबर एकवर नेऊ

महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येत आहे. सोमवारी एफडीआयचे आकडे जाहीर झाले आहेत. 2020-21 मध्ये गुजरात एक नंबरवर होता, 2021-22 मध्ये कर्नाटक एक नंबरवरच होता. पण आता आमचं सरकार आलं आहे ,आता महाराष्ट्राला नंबर एकवर नेऊ, असंही फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रातली परदेशी गुंतवणूक पाहिल्यास कोरोना आरोग्य संकटानंतर गुंतवणूक लक्षणीय घटल्याचे दिसते. एमआयडीसीच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, 2016-17 मध्ये महाराष्ट्रात 1 लाख 32 हजार 65 कोटी रुपयांची परदेशी गुंतवणूक केली गेली. 2017-18 मध्ये 87 हजार 412 कोटी रुपयांची गुंतवणूक राज्यात करण्यात आली, तर 2018-19 या आर्थिक वर्षात 77 हजार 847 कोटी रुपयांची परदेशी गुंतवणूक झाली. 2019-2020 या वर्षी 76 हजार 617 कोटी रुपयांची परदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात झाली, परंतु मार्च 2020 मध्ये जगभरात कोरोना संकट आल्यानंतर याचा मोठा फटका औद्योगिक क्षेत्राला बसला. याचे उदाहरण म्हणजे 2020-21 या वर्षात परदेशी गुंतवणूक खालावली.

26 हजार 220 कोटी रुपयांची गुंतवणूक यावर्षी झाली. 2016-17 या वर्षाशी तुलना केल्यास 2020-21 मध्ये गुंतवणूक जवळपास 70 टक्क्यांनी घटल्याचे दिसते. एमआयडीसीने दिलेल्या माहितीनुसार 2000 ते 2020 या 20 वर्षांत भारतातील एकूण थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्राचा वाटा 29 टक्के एवढा आहे.


हेही वाचा : महाराष्ट्राला उद्योगस्नेही धोरणांची गरज!


 

- Advertisment -