घरमहाराष्ट्रग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा पुन्हा नंबर 1 पक्ष, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दावा

ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा पुन्हा नंबर 1 पक्ष, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दावा

Subscribe

मुंबई : ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाबाबत उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रात भाजप पुन्हा एकदा नंबर वन पक्ष बनला आहे. यावेली त्यांनी कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत मराठीत ट्विट केले आहे.

याट्वीटमध्ये “मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखालील भाजप आणि शिवसेनेला ग्रामपंचायत निवडणुकीत घवघवीत यश मिळाले. भाजप पुन्हा नंबर 1 पक्ष ठरला. सर्व विजयी उमेदवारांचे आणि महाराष्ट्र भाजप कार्यकर्त्यांचे हार्दिक अभिनंदन. या यशासाठी प्रयत्न करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा, असे म्हटले आहे.

- Advertisement -

महाराष्ट्रात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर सत्ताधारी आणि विरोधी दोन्ही आघाडीने विजयाचे दावे केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, रात्री उशिरापर्यंत एकूण 494 ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल आले होते. यामध्ये सत्ताधारी आघाडीच्या उमेदवारांनी 185 जागा जिंकल्या आहेत, तर विरोधी महाविकास आघाडी आघाडीच्या उमेदवारांनी 225 जागा जिंकल्याचा दावा केला आहे.

या निवडणुकीत भाजपला 144 जागा मिळाल्या, तर मित्रपक्ष  शिंदे गटाला 41 जागा मिळाल्या. विरोधी पक्ष राष्ट्रवादीने सर्वाधिक म्हणजे १२६ जागा जिंकल्या आहेत. काँग्रेसने 62 जागा जिंकल्या आहेत, तर शिवसेनेच्या उद्धव गटाने 37 जागा जिंकल्या आहेत. इतरांनी 84 जागा जिंकल्या आहेत.

- Advertisement -

राज्यातील नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांच्या पक्षाचे 259 उमेदवार आणि शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाचे 40 उमेदवार सरपंचपदी विजयी झाल्याचा दावा महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी केला आहे. यावेळी पत्रकार परिषदेला संबोधित करताना बावनकुळे म्हणाले की, भाजप समर्थित 259 उमेदवार सरपंचपदी निवडून आले आहेत. पुढे त्यांनी दावा केला की भाजपचे मित्रपक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या गटाचे समर्थन असलेले 40 उमेदवार देखील सरपंचपदी निवडून आले आहेत.

एकूणच नवनिर्वाचित सरपंचांपैकी ५० टक्क्यांहून अधिक सरपंच हे शिंदे-भाजप युतीचे समर्थक आहेत, असे ते म्हणाले. बावनकुळे म्हणाले, आजच्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाने महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारवरील विश्वास दुजोरा दिला आहे. राज्यातील 16 जिल्ह्यांतील 547 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी रविवारी मतदान झाले, त्यात 76 टक्के मतदान झाले. या निवडणुका पक्षविरहित पद्धतीने झाल्या.  निवडणुका  सोमवारी मतमोजणी झाली.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -