‘हे’ पत्र देताना विरोधी पक्षाला काही गोष्टींची विस्मृती झाली, देवेंद्र फडणवीसांचा पलटवार

dcm devendra fadanvis says pfi is a silent killer 6 organizations will be banned in maharashtra

राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होणार आहे. त्याच्या पुर्वसंध्येला आम्ही चहापानाचा कार्यक्रम ठेवला होता. विरोधी पक्षाला आमंत्रित केलं होतं. नेहमीप्रमाणे विरोधी पक्षाने चहापानावर बहिष्कार टाकला आहे. त्यांनी आम्ही सातपानी पत्र आम्हाला दिलं आहे. यातली चार पानं बहुधा आम्ही दिलेल्या पत्रातली आहेत. त्यातल्या अक्षरांमध्येही काही फेरफार करण्यात आलेला नाही. तसेच शब्दांमध्येही फेरफार करण्यात आलेली नाही. त्यामुळे हे पत्र देताना विरोधी पक्षाला काही गोष्टींची विस्मृती झाली की, ते दीड महिन्यापूर्वीच सत्तेत होते, असा पलटवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर केला आहे.

देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी फडणवीस म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात जे मंत्रिमंडळ आज या ठिकाणी कार्यरत आहे. त्या मंत्रिमंडळावर विरोधी पक्षाचाही विशेष विश्वास दिसतो. त्यामुळे ज्या काही गोष्टी त्यांनी केल्या नाहीत. त्या गोष्टींची अपेक्षा आमच्याकडून व्यक्त केल्या आहेत. मी विरोधी पक्षांना अस्वस्थ करू इच्छितो की, आमचं शिवसेना-भाजप युतीचं सरकार त्यांच्या अपेक्षा निश्चितपणे पूर्ण करेल. आज मला आश्चर्य वाटलं की, आमच्या सरकारला म्हणाले की, हे बेईमानीचं सरकार आहे.

विधानसभेच्या निवडणुकीत ज्या लोकांनी एकत्रित युती म्हणून मतं मागितली होती. असे दोन पक्ष शिवसेना-भाजप एकत्रित येऊन हे सरकार तयार झालं आहे. महाविकास आघाडीचं सरकार हे बेईमानीचं सरकार होतं. कारण जनतेच्या मॅनडेटला सूरा खुपसून हे सरकार सत्तेत आलं होतं. ३२ दिवस त्या सरकारमध्येही मंत्रिमंडळ विस्तार नव्हता. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर महिन्याभरात खातेवाटप झालं होतं. त्यामुळे सुधीर मुनगंटीवार म्हणतात तसं, गझनीची लागण ही विरोधी पक्षांना झालेली दिसतेय. त्याची आठवण आम्ही निश्चितपणे करू. आमच्या सरकारची चिंता करण्यापेक्षा त्यांनी विरोधकांच्या एकजूटीची चिंता केली पाहीजे. कारण विरोधी पक्षात गेल्यानंतर तीन पक्षांच्या तीन दिशा पहायला मिळत आहेत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.


हेही वाचा : विधिमंडळाचे अधिवेशन वादळी होण्याची शक्यता, विरोधी पक्षांकडून शिंदे सरकारवर लेटरबॉम्ब