नगराध्यक्ष, सरपंचाची निवडणूक थेट झाल्यानंतर पैशांची खेळी करता येत नाही, उपमुख्यमंत्री फडणवीसांचा टोला

२०१७ साली फडणवीस सरकारने नगराध्यक्ष, सरपंचाची निवड थेट जनतेतून करण्याचा निर्णय मविआ सरकारने २०२० मध्ये रदद् केला होता. परंतु आता शिंदे गट-भाजप सरकारने युती झाल्यानंतर पुन्हा एकदा हा निर्णय बदलला असून आता नगराध्यक्ष, सरपंचाची निवड थेट जनतेतून करण्यात येणार आहे. मात्र, यावर विरोधकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. दरम्यान नगराध्यक्ष, सरपंचाची निवडणूक थेट झाल्यानंतर पैशांची खेळी करता येत नाही, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला लगावला आहे.

निवडणूक थेट झाल्यानंतर पैशांची खेळी करता येत नाही

राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. विरोधक म्हणतायत की जे नगराध्यक्ष, सरपंच यांची थेट निवडणुकीबाबत निर्णय विधीमंडळात घेण्याची गरज होती. एका व्यक्तिकडे सत्ता जाते. त्यामुळे काही समस्या निर्माण होतात. असा सवाल पत्रकारांनी विचारला असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, विरोधी पक्षनेते असा आरोप करत आहेत की, यापूर्वीही हा निर्णय घेण्यात आला होता. तो यशस्वीदेखील ठरला होता. पण ज्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या लक्षात आलं की, थेट नगराध्यक्ष आणि सरपंचाची निवडणूक झाल्यानंतर पैशांची खेळी करता येत नाही. जे हे लोकं पूर्वी करायचे. त्यामुळे त्यांनी तो निर्णय बदलला, असं फडणवीस म्हणाले.

अजित पवारांना पराभव दिसतोय

थेट नगराध्यक्षाची निवडणूक झाल्यानंतर भाजप-शिवसेनेचं सरकार होतं. त्यावेळी आमचे सर्वात जास्त उमेदवार निवडून आले. पैशाची खेळी येथे जमत नाही हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तो बंद केला आणि आम्ही पुन्हा तो सुरू केला. महाराष्ट्र सोडून सर्व राज्यांमध्ये सरपंच आणि नगराध्यक्ष यांची निवडणूक थेट जनतेतून केली जाते. काही राज्यांमध्ये महापौर थेट निवडणुका आहेत. आमच्या राज्यात तशी नाहीये. फक्त मी एक उदाहारण म्हणून सांगतो. पराभव दिसतोय असं विरोधी पक्षनेते अजित पवारांनी म्हटलं होतं. त्यामुळे ते बोलत आहेत, असं फडणवीस म्हणाले.


हेही वाचा : सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रीमंडळ विस्तार लांबव्यात काय अर्थ?, अजित पवारांचा