घरताज्या घडामोडीवेदांत प्रकल्पावरून विरोधकांची नौटंकी सुरू.., उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका

वेदांत प्रकल्पावरून विरोधकांची नौटंकी सुरू.., उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका

Subscribe

वेदांत प्रकल्पावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीका केली आहे. वेदांत प्रकल्पावरून विरोधकांची नौटंकी सुरू आहे. राज्यात लवकरच मोठी गुंतवणूक आणू, असं फडणवीस म्हणाले.

माझी फायनान्स विभागासोबत आढावा बैठक झाली. पुढच्या काळात अतिरिक्त साधण संपत्ती करून मोठी गुंतवणूक कशी आणता येईल, ते आम्ही पाहणार आहोत. जीडीपीच्या साडेतीन-चार टक्के गुंतवणूक कॅपिटल इनव्हेसमेंट म्हणून झाली पाहिजे किंवा एकूण बजेटच्या 25 टक्क्यांपर्यंत कशी नेता येईल, त्याबद्दल विचार सुरू आहे, असं फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

वेदांत प्रकल्पावरून विरोधकांची नौटंकी सुरू आहे. आमचे सरकार आल्यानंतर आम्ही वेदांत कंपनीला जागा दाखवली होती. तेव्हाच आम्हाला समजलं होतं की, ते गुजरातला जाणार आहेत. त्यावेळी आम्ही त्यांना पत्रं लिहिलं आणि स्वत: जाऊन भेटलो. त्यांना चांगले पॅकेज आणि चांगली जागा देऊ, असंही फडणवीस म्हणाले.

विविध राज्यांमध्ये येथील सरकारांनी अनेक चांगल्या गोष्टी केल्या आहेत. त्या गोष्टी पाहण्यासाठी मंत्री जाणार आहेत. त्या योजना महाराष्ट्रात कशाप्रकारे अंमलात आणता येतील, त्याबाबत विचार सुरू आहे, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : महाराष्ट्रात 20 हजार पदांसाठी पोलीस भरती, उपमुख्यमंत्र्यांची नवी


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -