घरताज्या घडामोडीG-20 : नागपूरचा चांगला अहवाल जगभरात जाणार; देवेंद्र फडणवीसांची माहिती

G-20 : नागपूरचा चांगला अहवाल जगभरात जाणार; देवेंद्र फडणवीसांची माहिती

Subscribe

नागपूरचा चांगला अहवाल जगभरात जाणार असून, जी-20च्या बैठकीसाठी नागपूरात आलेल्या लोकांना येथील इन्फ्रास्ट्रक्चर पाहायला मिळतील', असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. नागपुरात 20 व 21 मार्च रोजी जी-20 अंतर्गत सी-20 या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

‘नागपूरचा चांगला अहवाल जगभरात जाणार असून, जी-20च्या बैठकीसाठी नागपूरात आलेल्या लोकांना येथील इन्फ्रास्ट्रक्चर पाहायला मिळतील’, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. नागपुरात 20 व 21 मार्च रोजी जी-20 अंतर्गत सी-20 या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस आज नागपूरात दाखल झाले आहेत. (DCM Devendra Fadnavis In Nagpur For G20 Meeting)

नागपूरात दाखल झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर विमानतळावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ‘सर्वोत्तम तयारी करण्यात आली असून, लोकप्रतिनिधींनी देखील मोठ्या प्रमाणात मेहनत घेतली आहे. त्यामुळे जी20 निमित्त आलेल्या लोकांना नागपूरचे वैभव पाहायला मिळले. नागपूरमधील इन्फ्रास्ट्रक्चर पाहायला मिळतील. त्यांचे आपण उत्तम स्वागत करू’, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

‘ही मंडळी येते, त्यानंतर जाते तेव्हा संबंधित शहराचे नाव घेऊन जात असते. आतापर्यंत मुंबई, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे याठिकाणी ज्या बैठका झाल्या आहेत. त्यासंदर्भात अतिशय चांगले अहवाल जगभरात गेले आहेत. त्यानुसार नागपूरचाही अहवाल जगभरात जाण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत’, असेही यावेळी फडणवीस म्हणाले.

‘नागपूरात मोठ्या प्रमाणात समाजसेवी संस्थांचे प्रतिनिधी येणार आहेत. त्यामुळे जी-20मध्ये समाजोपयोगी ठराव होतील’, असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

दरम्यान, नागपुरात 20 व 21 मार्च रोजी जी-20 अंतर्गत सी-20 या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेसाठी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाचे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे चोख सुरक्षा बंदोबस्त राहणार आहे. व्हीआयपींची सुरक्षा लक्षात घेता २०-२१ मार्च रोजी नागपुरात ‘नो ड्रोन झोन’ राहणार आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारे, कुठल्याही कार्यक्रमात ड्रोनच्या वापरावर ते दोन दिवस बंदी राहणार आहे.


हेही वाचा – शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य, पण…, समितीबाबत सरकारला धास्ती

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -