…पण मी अशोक चव्हाणांना भेटलोच नाही, देवेंद्र फडणवीसांची स्पष्टोक्ती

devendra fadnavis

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ४० आमदार फोडल्यानंतर राज्यातील सत्तासंघर्षाचं चित्र पूर्णपणे बदललं आहे. शिवसेनेनंतर काँग्रेसचे आमदार देखील मोठ्या प्रमाणात फुटणार असल्याची चर्चा रंगत आहे. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. ही भेट आता कारणीभूत ठरली आहे. दरम्यान देवेंद्र फडणवीसांनी याबाबत स्पष्टोक्ती दिली आहे.

देवेंद्र फडणवीसांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, अशोक चव्हाण यांच्याशी माझी कोणतीही भेट झाली नाही. ते एका ठिकाणी गणपतीच्या दर्शनाला पोहोचले, मी पण पोहोचलो. ते गणपतीचे दर्शन घेऊन निघाले, तेवढ्यात मी पोहोचलो. अशा भेटी तर सगळ्यांच्याच होतात. पण अशोक चव्हाण आणि माझी विशेष अशी कोणतीही भेट झालेली नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगत स्पष्टीकरण दिले.

देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या १५० इलेक्ट्रिक बस आणि चार्जिंग स्टेशन्सचे लोकार्पण करण्यात आले. तसेच मी पुण्याचा पालकमंत्री होणार नाही, हेदेखील फडणवीस यांनी सांगितले.

अशोक चव्हाण नेमकं काय म्हणाले?

गणेशोत्सवाच्या निमित्ताने दोघांची भेट झाल्याची माहिती मिळाली. मी देवेंद्र फडणवीसांना भेटलो, आमच्यात विविध विषयांवर गप्पा झाल्या, मात्र राजकीय चर्चा झाल्या नाहीत, असं अशोक चव्हाण म्हणाले.


हेही वाचा : मी देवेंद्र फडणवीसांना भेटलो, अशोक चव्हाणांचा खुलासा