घरताज्या घडामोडीराज्यपालांचा राजीनामा घेण्याचा अधिकार फक्त राष्ट्रपतींना, राजीनाम्याच्या चर्चेवर फडणवीसांची प्रतिक्रिया

राज्यपालांचा राजीनामा घेण्याचा अधिकार फक्त राष्ट्रपतींना, राजीनाम्याच्या चर्चेवर फडणवीसांची प्रतिक्रिया

Subscribe

राज्यपाल भगतसिंग कोश्यारींच्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रकारच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेलं आक्षेपार्ह वक्तव्य हे कोश्यारी यांना चांगलंच भोवलं आहे. छत्रपतींचे वंशज कधीच हतबल होवू शकत नाहीत, उदयनराजे भोसले यांच्या मागे महाराष्ट्र आहे. राज्यपाल हे पद संवेदनीक पद असते, सरकार त्याला काहीही करू शकत नाही राज्यपालांचा राजीनामा घेण्याचा अधिकार फक्त राष्ट्रपतींना असतो, उदयनराजेंच्या भावनांच्या पाठीशी आम्ही सगळेजण ठामपणे आहोत, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

अभिनेते विक्रम गोखले यांच्या बावधन पुणे येथील निवासस्थानी त्यांच्या कुटुंबीयांची देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. तसेच भेट घेऊन त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ते तिथे पोहोचले होते. त्यावेळी फडणवीसांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा मोठा प्रेरणा स्त्रोत दुसरा कोणी असू शकत नाही, राज्याचे आणि देशाचे आदर्श शिवाजी महाराजच आहेत, असं मत फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे.

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपल्याशी बोलताना राज्यपालांनी परत जाण्याची इच्छा व्यक्त केली होती, असे वक्तव्य केले होते. अशातच राज्यपालांच्या वक्तव्यावरून विरोधी पक्ष आक्रमक झाला आहे. खासदार छत्रपती उदयनराजे भोसले आणि संभाजीराजे छत्रपती या दोघांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यपालांच्या परत जाण्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र राजभवनमधील सूत्रांनी राज्यपाल राजीनामा देणार असल्याच्या बातमीत कोणतेही तथ्य नसल्याचे स्पष्ट केले आहे.


हेही वाचा : राज ठाकरेंच्या भाषणावर भाजपचा प्रभाव, त्यांनी मुळ शैली जपावी : रोहित पवार

- Advertisement -

 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -