घरताज्या घडामोडीबाहेरून या सरकारला मदत करण्याची माझी मानसिकता, देवेंद्र फडणवीसांचा खुलासा

बाहेरून या सरकारला मदत करण्याची माझी मानसिकता, देवेंद्र फडणवीसांचा खुलासा

Subscribe

... म्हणून सत्तेत सहभागी

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सरकारला बाहेरून मदत करण्याबाबत माझी मानसिकता होती, असा खुलासा फडणवीसांनी केला आहे. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय भाजपाने घेतला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डी आणि माझ्या सहमतीने या निर्णय घेण्यात आला. परंतु हा प्रस्ताव माझ्याकडून मांडण्यात आला नव्हता. एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं पाहीजे, हे त्यांनी मान्य केलं. मात्र, त्यावेळी मी बाहेर असेन असचं ठरलं होतं. मात्र, ज्यावेळी राज्यपालांना पत्र देऊन पत्रकार परिषद झाली. ती प्रेस कॉन्फरन्स करून मी घरी गेलो. त्यावेळी मला जे.पी. नड्डा यांचा फोन आला. त्यांना मला उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यास सांगितली. मात्र, त्यावेळी माझी मनाची तयारी नव्हती. आपण बाहेर राहून या सरकारची मदत केली पाहीजे, अशी माझी मानसिकता होती. परंतु यावर पीएम मोदींची चर्चा झाली, असा खुलासा देवेंद्र फडणवासींनी केला आहे.

मला कमीपणा वाटत नाही

मोदींची चर्चा झाल्यानंतर जे.पी.नड्डा यांनी पब्लिक स्टेटमेंट दिलं. त्या सगळ्यांची अशी इच्छा होती की, सरकार बाहेर राहून चालत नाही. सरकार चालवायचं असेल तर सरकारमध्ये गेलं पाहीजे. माझ्या वरिष्ठांच्या आज्ञाचं पालन करत मी निर्णय बदलला. त्यानंतर मी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यावेळी मला कोणत्याही प्रकारचा कमीपणा वाटत नाही, असं फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

युतीच्या सरकारला विजय मिळाला

राज्यात नवीन सरकार आल्यानंतर आणि उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर सर्वात पहिलं निमंत्रण हे नागपूर प्रेस क्लबने मला दिलं. नागपूर आपली कर्मभूमी आणि जन्मभूमी आहे. कालच आम्ही विश्वासमत प्रस्ताव प्रचंड बहुमताने जिंकलेला आहे. आमच्या बाजूने १६४ मतं आणि त्यांच्या बाजूने ९९ मतं मिळाल्यानंतर आमच्या युतीच्या सरकारला विजय मिळाला, असं फडणवीस म्हणाले.

विदर्भ आणि मराठवाड्यावर अन्याय या सरकारने केला

महाराष्ट्रात २०१९ला जनतेनं भाजपा-शिवसेना युतीला होकार दिला होता. परंतु आमचं मॅनडेट हे छदमी पडलं. त्यामुळे युती होऊ शकली नाही. परंतु मला मुख्यमंत्री होता आलं नाही, या गोष्टीचा खेद नव्हता. तर आलेल्या सरकारने राज्याच्या विकासाच्या गतीला आडकाठी लावण्याचा प्रयत्न केला होता, याचं तेवढं दुख: होतं. त्यामुळे विकासाचे सर्व प्रकल्प थांबवण्यात आले. शेतकऱ्यांचे प्रकल्प थांबवण्यात आले. इंडस्ट्रीवर त्याचा परिणाम झाला. विदर्भ आणि मराठवाड्यावर अन्याय या सरकारने केला, असं फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

एकनाथ शिंदे हे माझे सहकारी आहेत. ते सरकारच्या माध्यमातून नेतृत्व करत आहेत. माझं त्यांना संपूर्ण सहकार्य असणार आहे. आम्ही दोघं मिळून विशेषत: महाराष्ट्राची जी गाडी रुळावरून खाली उतरली आहे. ती पुन्हा रूळावर आणू. मोदीजींच्या नेतृत्वात महाराष्ट्र पुन्हा देशातील नंबर १ चं राज्य आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. तसेच विदर्भातील सिंचनाच्या विषयाबाबत ८९ प्रकल्प केंद्राकडून मंजूर करून घेतले आहेत, असं फडणवीस म्हणाले.


हेही वाचा : उद्धव ठाकरेंच्या आजूबाजूला चार बडवे त्यांनीच..,रमेश बोरणारेंचा


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -