घरताज्या घडामोडीवरुण सरदेसाईंकडून युवकांची फसवणूक, योगेश सागरांच्या आरोपांवर फडणवीसांकडून चौकशीचे आश्वासन

वरुण सरदेसाईंकडून युवकांची फसवणूक, योगेश सागरांच्या आरोपांवर फडणवीसांकडून चौकशीचे आश्वासन

Subscribe

भाजपचे आमदार योगेश सागर यांनी विधानसभेत युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांचे नाव घेऊन त्यांच्याशी संबंधित संस्थेवर युवकांना नोकरीचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप केला, यावेळी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी चौकशी करण्याचे आश्वासन दिले.

आज विधानसभेत प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर सागर यांनी वरुण सरदेसाई आणि रुपेश कदम यांच्याशी संबंधित हिंदुस्थान स्काऊट अँड गाईड या संस्थेकडून झालेल्या बेरोजगार तरुणांच्या फसवणुकीचा मुद्दा उपस्थित केला.

- Advertisement -

हिंदुस्थान स्काऊट अँड गाईड ही संस्था शासनमान्य असल्याचे भासवून गरीब बेरोजगार तरुणांकडून नोकरी लावण्याच्या बहाण्याने लाखो रुपये उकळले. गरिब कुटुंबांनी आपली जमीन, शेती विकून १०-१० लाख रुपये दिले. पैसे मिळाल्यानंतर या तरुणांना प्रशिक्षणाच्या नावाखाली गोंदियातील शाळेत पाठविण्यात आले. त्यासाठी शाळा उभी करण्यात आली. फसवणूक झालेले तरुण हे चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील आहेत.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या तरुणांनी पैशांसाठी तगादा लावला. मात्र, त्यांना अद्याप त्यांचे पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळे या संस्थेने आणखी किती जणांची फसवणूक केली आहे, याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सागर यांनी केली. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकार निश्चितपणे चौकशी करेल, असे सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा :  सेक्सटॉर्शनविरोधात राज्यात कडक कायदा आणणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -