घरताज्या घडामोडीमुख्यमंत्री आणि मी पोटनिवडणुकीच्या प्रचाराला गेल्याने अजित पवारांना पोटदुखी - फडणवीस

मुख्यमंत्री आणि मी पोटनिवडणुकीच्या प्रचाराला गेल्याने अजित पवारांना पोटदुखी – फडणवीस

Subscribe

राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उद्यापासून सुरूवात होणार आहे. यावेळी शिंदे-फडणवीस सरकारकडून चहापानाचा कार्यक्रम मुंबईत पार पडला. चहापानाचा कार्यक्रम झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली.

‘पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या प्रचाराला मी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेलो होतो. त्यामुळे अजित पवार यांच्या पोटात फार दुखलेलं दिसतंय’, अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांन प्रत्युत्तर दिले. (DCM Devendra Fadnavis Slams Ajit Pawar)

राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उद्यापासून सुरूवात होणार आहे. यावेळी शिंदे-फडणवीस सरकारकडून चहापानाचा कार्यक्रम मुंबईत पार पडला. चहापानाचा कार्यक्रम झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. ‘पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या प्रचाराला मी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेलो होतो. त्यामुळे अजित पवार यांच्या पोटात फार दुखलेलं दिसतंय. पण मी त्यांना आठवण करून देतो की, आम्ही फक्त दोन तीनच दिवस गेलो होतो. पंढरपूर निवडणुकीच्यावेळी ते पुर्णवेळ तिकडे बसले होते. नांदेड निवडणुकीवेळी अशोक चव्हाण पुर्णवेळ तिकडे बसले होते. पण निवडणुका आहेत तर, प्रचाराला गेल्यास हरकत काय आहे’, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

‘आम्ही प्रचाराला गेलो असलो तरी, आमच्या सरकार काम कुठेही थांबलेले नाही. सरकारने वेगाने वेगवेगळे निर्णय घेतलेले आहेत. महाविकास आघाडीच्या काळात त्यांनी शेतकऱ्यांना मदत म्हणून केवल ६ हजार कोटी दिले. पण आम्ही सात महिन्यामध्ये मदतीचे पैसे आणि शेतकऱ्यांच्या खात्यात ५० हजार रुपये दिले. असे आम्ही एकूण १२ हजार कोटी रुपये दिले. तसेच, केवळ सात महिन्यांत २३ सिंचन प्रकल्पांना सुधारीत प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यामधुन जवळपास ५ लाख २१ हजार हेक्टर सिंचन होणार आहे. त्यांच्याकाळात सुधारीत मान्यता मिळत नव्हती. त्यामुळे आम्ही एखाद्या पोटनिवडणुकीच्या प्रचाराला गेलो. तरी देखील आम्ही २४ तास काम करतो’, असेही देवेद्र फडणवीस म्हणाले.


हेही वाचा – सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींवर ठाकरे बोलणार का?, देवेंद्र फडणवीसांचा सवाल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -