घरताज्या घडामोडीकोणाच्याही दबावाला विधानसभा अध्यक्ष बळी पडणार नाही; फडणवीसांचा ठाकरे गटाच्या आमदारांना टोला

कोणाच्याही दबावाला विधानसभा अध्यक्ष बळी पडणार नाही; फडणवीसांचा ठाकरे गटाच्या आमदारांना टोला

Subscribe

'मला विश्वास आहे की, कोणी कितीही दबाव आणण्याचा प्रयत्न केला तरी विधानसभा अध्यक्ष कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही', अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी ठाकरे गटाच्या आमदारांवर निशाणा साधला आहे.

‘मला विश्वास आहे की, कोणी कितीही दबाव आणण्याचा प्रयत्न केला तरी विधानसभा अध्यक्ष कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही’, अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी ठाकरे गटाच्या आमदारांवर निशाणा साधला आहे. शिवसेनेतील 16 आमदारांना पात्र किंवा अपात्र ठरविण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांकडे दिला आहे. त्यामुळे विधान सभा अध्यक्षांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. अशातच आज शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांनी विधान विधानसभा उपाध्यक्षांची भेट घेतली. या भेटीच्या पार्श्वभूमीवर आज देवेंद्र फडवणीस यांनी ठाकरे गटाच्या आमदारांवर निशाणा साधला. (DCM Devendra Fadnavis Slams Uddhav Thackeray Group Vidhan Sabha Chief)

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ठाकरे गटाच्या आमदारांवर हल्लाबोल केला. “हे जे काही सुरू आहे, ते कोणत्या लोकशाहीत बसण्यासारखे आहे? आम्ही विधानसभा अध्यक्षांना घेराव करू, त्यांना चालू देणार नाही, आम्ही त्यांना फिरू देणारन नाही. अशा दबावातून कधीच विधानसभा अध्यक्ष निर्णय घेत नसतात. तुम्ही खरे असाल तर तुमचा मुद्दा मांडा”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – राज्यात दंगली घडवणाऱ्यांना सोडणार नाही; गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा

“खरं तर तुम्हाला माहिती आहे की, याठिकाणी तुमची बाजू कमकुवत आहे. त्यामुळे अशाप्रकरे भाषा वापरणे सुरू आहे. परंतु, विधानसभा अध्यक्ष वकील आहेत. कायदा समजणारे आहेत. वर्षांनुवर्षे सराव केलेले आहेत. ते कोणतेही बेकायदेशीर काम करणार नाही. स्पष्टपणे सर्वोच्च न्यायालयाने रिझनेबल टाईम म्हटले आहे. त्यामुळे या रिझनेबल टाईमचा अर्थही अध्यक्षांना समजतो. त्यामुळे ते योग्यप्रकारे निर्णय घेतील”, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

“मला विश्वास आहे की, कोणी कितीही दबाव आणण्याचा प्रयत्न केला तरी विधानसभा अध्यक्ष कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही”, असेही यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले.


हेही वाचा – विधानसभा अध्यक्षांनी 15 दिवसांत 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय घावा – सुनील प्रभू

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -