घरताज्या घडामोडीमविआचं कोकणावरील प्रेम बेगडी, चिपी विमानतळाचं श्रेय नारायण राणेंनाच.., फडणवीसांचा ठाकरेंना टोला

मविआचं कोकणावरील प्रेम बेगडी, चिपी विमानतळाचं श्रेय नारायण राणेंनाच.., फडणवीसांचा ठाकरेंना टोला

Subscribe

चिपी विमानतळाचं श्रेय नारायण राणेंना दिलं पाहीजे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुढाकार घेतला आणि जेव्हा मी मुख्यमंत्री झालो. त्यावेळी काही अडचणी होत्या, त्या अडचणी आपण दूर केल्या. चिपी विमानतळाचं काम राणेंनी पूर्णपणे मार्गी लावलं होतं. सुरेश प्रभू आणि आपण सगळ्यांनी मिळून त्याचं उद्घाटन केलं. पण काही लोकांना दोन-दोन वेळा उद्घाटन करण्याचा शौक असतो, असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना टोला लगावला.

आंगणेवाडी जत्रोत्सवात आई भराडीच्या दर्शनासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते. दर्शन घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी संबोधित केलं. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. ज्यांनी चिपी विमानतळासाठी काहीच केलं नाही. एक विट देखील रचण्याकरिता मदत केली नाही. त्यांनी पुन्हा एकदा चिपी विमानतळाचं उद्धाटन केलं. अडीच वर्षात मविआ सरकारने कोकणासाठी काहीच केलं नाही. दोन चक्री वादळं आल्यानंतर मदतीसाठी दीडशे ते दोनशे कोटी रुपये द्यायचे होते. ते देखील त्यांनी दिले नाहीत. मदतीसाठी एक फुटकी कवडी देखील त्यांनी दिलं नाही, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी मविआवर टीका केली.

- Advertisement -

पाच वर्षांत काम करण्याची संधी मिळाली. चांदा ते बांदा यांसारख्या वेगवेगळ्या पर्यटनाच्या योजनांना आपण मोठ्या प्रमाणात निधी दिला. रस्ते, मुलभूत सोयी याकरिता आपण निधी दिली. काजू, नारळ, सुपारी यासंदर्भातल्या विविध योजना या त्याकाळात आपण आणल्या. परंतु या योजना उद्धव ठाकरेंना त्यांचं सरकार असताना आणता आली नाही. त्यामुळं यांचं प्रेम बेगडी आहे, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

जामनगरमध्ये जी रिलायन्सची रिफायनरी आहे. ती मागच्या पिढीतली असून ती आजच्या पिढीतली नाहीये. परंतु आज त्यांनी आपल्या कोकणातला आंबा तिथे नेला. सर्वाधिक आंब्यांची निर्यात ही जामनगरमधून गुजरातमध्ये होत आहे. ठाकरेंनी विरोधी केला नसता तर रिफायनरी प्रकल्प तयार झाला असता. रिफायनरी प्रकल्पामुळे १ लाख लोकांना रोजगार मिळाला असता. रिफायनरीबाबत लोकांना खोटं सांगण्यात आलं. आंबा पिकणार नाही, मासेमारी होणार नाही, असं सांगण्यात आलं. आपलं सरकार आलं नसतं तर केंद्र सरकारने निर्णय घेतला होता की, हा प्रकल्प तीन राज्यात नेणार म्हणून…परंतु आई भराडीदेवीच्या आशीर्वादाने सरकार बदललं आणि केंद्र सरकारला सांगितलं की, हा प्रकल्प आम्ही महाराष्ट्राबाहेर जाऊ देणार नाही. आम्हाला हा प्रकल्प हवाय. आमच्या मुलांच्या हाताला काम मिळालं पाहीजे. या प्रकल्पामुळे महाराष्ट्राची पुढील २० वर्षांची वाटचाल आणि अर्थव्यवस्था ही सुदृढ होणार आहे. परंतु मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याचं काम यांनी केलं, असंही फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

नारायण राणेंचा ठाकरेंना निशाणा

देवेंद्र फडणवीसांना माजी मुख्यमंत्री बोलायला आवडत नाही, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आंगणेवाडीच्या सभेत केलं. कुणीजरी मला कितीही ऑफर दिली तरी दगाफटका माझ्याकडून होणार नाही. ऑफर देणाऱ्याला दगा होईल किंवा फटका होईल. पण माझ्याकडून होणार नाही. चांगल्या गोष्टींना चांगलं म्हणणं हा माणुसकीचा धर्म आहे. मोदी देशाला महासत्तेकडे घेऊन चाललेत. ठाकरेंनी कोकणाला काय दिलं. मुंबई लुटली गेली, असं म्हणत नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.


हेही वाचा : मस्तच! मुंबई-सिंधुदुर्गं “ग्रीनफील्ड” रस्त्याने जोडणार; मुख्यमंत्र्यांची घोष


णा

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -