घर ताज्या घडामोडी गर्भवती माता आणि बालकांसाठी 'किलबिलाट ॲम्ब्युलन्स' नाविन्यपूर्ण उपक्रम : देवेंद्र फडणवीस

गर्भवती माता आणि बालकांसाठी ‘किलबिलाट ॲम्ब्युलन्स’ नाविन्यपूर्ण उपक्रम : देवेंद्र फडणवीस

Subscribe

गर्भवती माता आणि बालक यांच्यासाठी आल्हाददायक वातावरण असलेली ‘किलबिलाट ॲम्ब्युलन्स’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली. सह्याद्री अतिथीगृह येथे किलबिलाट ॲम्ब्युलन्सच्या उद्घाटनानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार प्रवीण दरेकर, मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. एकबाल सिंह चहल यासह मान्यवर उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, या ॲम्बुलन्सच्या माध्यमातून गर्भवती माता आणि बालकांना चांगली सुविधा मिळणार असून, ज्या बालकांना कोणी पालक नाही, अशा बालकांचे पुनर्वसन करणे त्यांना योग्य उपचार मिळवून देणे, ही सेवा प्राधान्याने दिली जाणार आहे. या उपक्रमासाठी महिला व बालविकास विभाग, जिल्हा नियोजन आणि मुंबई महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवला जात आहे. महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे मी अभिनंदन करतो आणि या उपक्रमाला शुभेच्छा देतो, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

पाच हॉस्पिटलमध्ये किलबिलाट ॲम्ब्युलन्सची सेवा मिळणार:  मंगलप्रभात लोढा

- Advertisement -

महिला व बाल विकास मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री असताना गुजरातेत  किलबिलाट ॲम्ब्युलन्स सेवा सुरू केली होती. त्याच धर्तीवर मुंबईत आणि महाराष्ट्र राज्यात ही सेवा सुरू करण्यात येत प्रथम एक असलेली ॲम्बुलन्स मुंबई उपनगरातील पाच रुग्णालयांना जोडली जाईल. नंतर याचा राज्यभर विस्तार करण्यात येईल.

किलबिलाट ॲम्ब्युलन्स

ॲम्ब्युलन्समधील तणावाचे वातावरण याऐवजी बाळाच्या गोड आवाजाचा सायरन, आत रंगीबेरंगी चित्रे, मंद संगीताची सोबत असे आल्हाददायक वातावरण, बाळंतीण आणि बाळालाही असा आनंद देणाऱ्या किलबिलाट ॲम्ब्युलन्स मुंबईच्या रस्त्यावर आता धावणार असून बाळंतपणासाठी वा गरोदरपणाच्या काळात काही त्रास झाला तर इस्पितळात पोहोचविण्यासाठी बाळ आजारी असल्यास इस्पितळात नेण्यासाठी याचा वापर करता येणार आहे. ॲम्ब्युलन्सच्या दर्शनी भागावरही समीरणी चित्रे असतील. आत नवजात शिशूना टप्याटप्याने देण्यात येणाचा लसीबाबतची माहिती लावलेल असेल. तसेच जवळपासच्या इस्पितळाच माहितीही दिलेली असेल.


- Advertisement -

हेही वाचा : मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. कुलकर्णी, तर पुणे विद्यापीठाचे डॉ. गोसावी


 

- Advertisment -