घरताज्या घडामोडीविनायक मेटेंच्या अपघाती निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आणि धक्कादायक : उपमुख्यमंत्री देवेंद्र...

विनायक मेटेंच्या अपघाती निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आणि धक्कादायक : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Subscribe

शिवसंग्रामचे नेते, आमचे सहकारी, माजी आमदार विनायक मेटे यांच्या अपघाती निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आणि धक्कादायक आहे', असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

‘शिवसंग्रामचे नेते, आमचे सहकारी, माजी आमदार विनायक मेटे यांच्या अपघाती निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आणि धक्कादायक आहे’, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या निधनानंतर त्यांना नवी मुंबईच्या एमजीएम रुग्णालयात दाखल झाले होते. रुग्णालयात चौकशी झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी विनायक मेटे यांनी श्रद्धांजली वाहिली. तसेच, “मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांचे कुटुंबीय, आप्तस्वकीय आणि कार्यकर्त्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती परमेश्वर देवो, अशी प्रार्थना करतो”, असेही फडणवीस यांनी म्हटले.
(Dcm Devendra Fadnavis talk on vinayak mete death at navi mumbai)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमजीएम रुग्णालयामध्ये चौकशी केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. “अतिशय संघर्षातून आयुष्य जगत, गरिबीतून दिवस काढत विनायकराव मेटे यांनी आपले आयुष्य उभे केले होते. समाजकार्यासाठी स्वतःला झोकून देताना मागास भागाचा विकास आणि मराठा समाजाचे कल्याण हे त्यांचे जिव्हाळ्याचे विषय होते आणि त्यासाठी त्यांनी मोठा संघर्ष उभारला. तळागाळातील विषयांची साकल्याने माहिती त्यांना असायची आणि त्यातून एखाद्या गोष्टीसाठी पाठपुरावा कसा करायचा हे त्यांना ठावूक असायचे. त्यामुळेच राज्याच्या राजकारणात त्यांनी आपले वेगळे अस्तित्व सिद्ध केले. मराठा समाजाला नेतृत्व देणारे व्यक्तिमत्व आज हरपले आहे”, असे फडणवीस यांनी म्हटले.

- Advertisement -

“गेल्याच महिन्यात त्यांचा वाढदिवस साजरा झाला. अगदी या आठवड्यात सुद्धा मंत्रालयात विविध विषयांवर त्यांच्याशी चर्चा झाली होती आणि आज काळाने त्यांना आपल्यातून हिरावून नेले”, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

अपघाताच्या चौकशीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

- Advertisement -

“या सर्व प्रकाराची गंभीर दखल घेतली जाईल. तसेच शासन त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहोत. ही घटना आमच्यासाठी खूपच गंभीर आहे. या घटनेची चौकशी वगैरे या सगळ्या गोष्टी होतील”, असेही एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

घटनास्थळीच निधन

विनायक मेटेंचा अपघात पहाटे 5:30 वाजताच्या सुमारास रसायनीजवळ अपघात झाला. त्यांना फार गंभीर जखमा झाल्या होत्या. बहुतेक त्यांचं घटनास्थळीच निधन झालं होतं. त्यांना 6 वाजून 20 मिनिटांनी आमच्या रुग्णालयात आणलं गेलं. इथे आणल्यानंतर त्यांना लगेच तपासण्यात आलं. त्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आलं.


हेही वाचा – जेव्हा-जेव्हा विनायक मेटे भेटले तेव्हा-तेव्हा त्यांची तळमळ जाणवली – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -