घरमहाराष्ट्रउद्धव ठाकरेंनी स्क्रिप्ट रायटर बदलला पाहिजे, फडणवीसांची ठाकरेंवर जळजळीत टीका

उद्धव ठाकरेंनी स्क्रिप्ट रायटर बदलला पाहिजे, फडणवीसांची ठाकरेंवर जळजळीत टीका

Subscribe

सुज्ञ माणसं शिमग्यावर प्रतिक्रिया देत नाहीत. तसंच, उद्धव ठाकरेंनी स्क्रिप्ट रायटर बदलला पाहिजे, अशी टीका देवेंद्र फडणवीस उद्धव ठकराेंच्यावर भाषणावर केली आहे.  

मुंबई – दसरा मेळाव्यानिमित्त एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उद्धव टाकरे (Uddhav Thackeray) यांनी जोरदार भाषण केलं. दोन्ही ठिकाणी लाखोंची गर्दी जमली होती. यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उद्धव ठाकरेंच्या भाषणावर टोला लगावला आहे. सुज्ञ माणसं शिमग्यावर प्रतिक्रिया देत नाहीत. तसंच, उद्धव ठाकरेंनी स्क्रिप्ट रायटर बदलला पाहिजे, अशी टीका देवेंद्र फडणवीस उद्धव ठकराेंच्यावर भाषणावर केली आहे.

हेही वाचा – होय गद्दारच म्हणणार! बुडाला लागलेली मंत्रिपदं जातील, पण गद्दारीचा शिक्का पुसला जाणार नाही; ठाकरेंचा हल्लाबोल

- Advertisement -

मी दोन्ही भाषणं ऐकली नाहीत. कारण, मी धम्मचक्र प्रवर्तनाच्या कार्यक्रमात होतो. त्यानंतर, दोन्ही भाषणाचा थोडा थोडा सारांश मी ऐकला. युट्यबूवर एकनाथ शिंदेंचं भाषण बघितलं. मी एवढंच सांगू शकेल, मी उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यावर काहीच प्रतिक्रिया देणार नाही, कारण शिमग्यावर कधीच प्रतिक्रिया द्यायची नसते, असं म्हणत फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना डिवचलं.

उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यापेक्षा एकनाथ शिंदेंच्या मेळाव्याला अधिक गर्दी होती. त्यामुळे खरी शिवसेना एकनाथ शिंदेंचीच आहे हे सिद्ध झालंय. त्यामुळे मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं अभिनंदन करतो. परंतु, उद्धव ठाकरेंनी स्क्रीप्ट रायटर बदलला पाहिजे, दरवेळी तेच ते तेच ते.. एकतर स्क्रीप्ट रायटर बदला किंवा स्क्रीप्ट रायटरला क्रिएटीव्ह लिखाण करायला लावा, असा सणसणीत टोलाही उद्धव ठाकरेंना लगावला. येत्या विधानसभा निवडणुकीवर एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेना आणि भाजपच्या युतीचा भगवा फडकणारच, असंही फडणवीसांनी ठणकावून सांगितलं.

- Advertisement -

हेही वाचा – “काहींचे भाषण…”, दसरा मेळाव्यांबाबत राष्ट्रवादीच्या अजित पवारांची बोलकी प्रतिक्रिया

होय, तुम्ही गद्दारच

डॉक्टरांनी मला सांगितलं आहे वाकायचं नाही. पण, तुमच्यासमोर नतमस्तक झाल्याशिवाय मी पुढे जाऊच शकत नाही. प्रत्येक वेळेला संकटावेळी संरक्षक कवच मी अनुभवतोय. आई भवानीच्या आशीर्वादाचं जीवंत संरक्षक कवच तुम्ही आहात. शिवसेनेमध्ये गद्दारी केली. होय गद्दारच म्हणणार. मंत्रिपदं तुमच्या बुडाला चिकटलेली असली तरी ती काही काळापुरती आहेत. पण गद्दारीचा शिक्का पुसला जाणार नाही. ज्यांनी हे कार्य सोपवलं आहे तो बघून घेईल. शिवतीर्थ बघितल्यावर गद्दारांना कळेला. येथे एकसुद्धा माणूस भाड्याने आणलेला नाही. तासाची बोली लावून आणलेला नाही. माता भगिनींना विचारा गावारून पायी चालत आले आहेत. तिकडे एक एकटाचा आहे, पण इथे एकनिष्ठ आहेत. ही ठाकरे कुटुंबियांची कमाई आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -