घरमहाराष्ट्रमुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षांना उघडं पाडलं; अधिवेशनानंतर उपमुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर घणाघात

मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षांना उघडं पाडलं; अधिवेशनानंतर उपमुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर घणाघात

Subscribe

राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन आज संपन्न झालं. या अधिवेशनात सत्ताधारी- विरोधकांमध्ये विविध योजना, घोटाळे आणि विकासाच्या मुद्द्यावरून आरोप प्रत्यारोपांचा डाव रंगला. दरम्यान अधिवेशन संपल्यानंतर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भासाठी महत्वाचे निर्णय घेतल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर आभार मानले. तसेच मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षांनी मांडलेल्या प्रस्तावावर अतिशय प्रभावी उत्तर देऊन विरोधी पक्षांना उघडं पाडलं, अशी घणाघाती टीका केली.

मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षांना उघडं पाडलं

नागपूरला अधिवेशन घ्या यासाठी बोलतो की, नागपूरच्या अधिवेशनात विदर्भ अजेंड्यावर असतो, आणि तो अजेंड्यावर ठेवून निर्णय घेतले. अतिशय यशस्वी मुख्यमंत्री शिंदे यांच पहिलचं अधिवेशन त्यांच्या नेतृत्त्वाखाली यशस्वी झालं आहे. विरोधी पक्षांनी मांडलेल्या प्रस्तावावर अतिशय प्रभावी उत्तर मुख्यमंत्र्यांनी देऊन विरोधी पक्षांना उघडं पाडलं आहे, असही फडणवीस म्हणाले. ते पुढे म्हणाले की, महापुरुषांचा विषय असो किंवा राजकीय कारवायांचा विषय असो, औद्योगिक, सिंचनाचा विषय असो प्रत्येक विषयाची योग्य आकडेवारी मांडून हे सरकार कसं प्रभावी काम करतयंत हे विरोधकांना आणि महाराष्ट्राला लक्षात आणून दिल्याचंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

- Advertisement -

लोकशाहीची दुहाही देणारे संपूर्ण अधिवेशनात फक्त ४६ मिनिटे होते

यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरही अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला आहे. फडणवीस म्हणाले की, जे लोक रोज लोकशाही दुहाही देत होते, लोकशाही विरोधी सरकार आहे, लोकशाही पाळली जात नाही, लोकशाहीची हत्या होत आहे. अशी लोकशाहीची दुही देणारे संपूर्ण अधिवेशनात सभागृहात फक्त ४६ मिनिटे होते. त्यामुळे लोकशाहीवर त्यांचं किती प्रेम आहे हे याववरून लक्षात येतं. सर्वोच्च सभागृहात केवळं तुम्ही ४६ मिनिटं देता, असं म्हणत उपमुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

विरोधी पक्षाचेही उपमुख्यमंत्र्यांनी मानले आभार 

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, विधिमंडळाचं हिवाळी नुकतचं संपन्न झालं, दोन्ही सभागृहात भरपूर कामकाज दोन आठवड्याच्या अधिवेशनात पार पडलं. सुरुवातीच्या काळात बहिष्कार झाला, सभागृह बंद पाडण्यात आल, पण नंतरच्या काळात सकाळी नऊ ते रात्री अकरा, सकाळी नऊ ते रात्री साडे अकरा असं सातत्याने सभागृह चालवून वेळेची भरपाई केली. मोठ्याप्रमाणात अधिवेशनात कामकाज करण्यात आलं, त्यामुळे विरोधी पक्षाचेही उपमुख्यमंत्र्यांनी आभार मानले.

- Advertisement -

विदर्भवासी म्हणून उपमुख्यमंत्र्यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

सुरुवातीला जरी त्यांनी अधिवेशन बंद पाडण्याची भूमिका घेतली तरी नंतरच्या काळात त्यांनी अधिवेशनात सहभाग घेतला, त्यामुळे अनेक महत्वाच्या चर्चा होऊ शकल्या, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष आभार मानतो कारण विदर्भात होणारे अधिवेशन विदर्भाला काही तरी देऊन जाणारं असलं पाहिजे अशाप्रकारची नेहमी अपेक्षा असते. तीन वर्षे विदर्भात अधिवेशन झालं नाही, त्यामुळे ते होईल की नाही अशी शंका होती, परंतु अधिवेशन झालं ही आणि अत्यंत महत्वाचे निर्णय विदर्भासाठी मुख्यमंत्र्यांनी घोषित केले म्हणत एक विदर्भवासी म्हणून त्यांचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचे मनापासून आभार मानले.

शेतकऱ्याचा बोनस शेतकऱ्याला व्यापाऱ्याला नाही

धान उत्पादक शेतकऱ्यांना १५ हजार रुपये २ हेक्टरी देण्याचा निर्णय घेतला. या नवीन बोनसच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना थेट खात्यात बोनस मिळेल, आणि शेतकऱ्याच्या नावाने छत्तीसगडमधून धान आणून जे लोकं बोनस कमवण्याचा प्रयत्न करत होते, त्यांवर मोठ्याप्रमाणात चाप याठिकाणी बसेल. शेतकऱ्याचा बोनस शेतकऱ्याला व्यापाऱ्याला नाही, अशाप्रकारची नवीन पद्धत स्वीकारली म्हणून मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो. यामुळे आधीपेक्षा जास्त शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्र्यांनी दिली.

हे सरकार आल्यानंतर विदर्भात ३५ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांची घोषणा

सिंचनाचे प्रकल्प, नागपूर- गोवा मार्गासारखा प्रकल्प, मोठ्या प्रमाणात पर्यटनाचे प्रकल्प जाहीर केले, त्यासोबत नानाजी जोशी कृषी समृद्धीची दुसरा टप्पा घोषित केला, एक एका प्रकल्पाची किंमत सहा हजार कोटी, २०-२२ हजार कोटी, सिंचनाचे प्रकल्प ८० हजार कोटींच्या घरात आहेत. त्यामुळे खूपमोठ्याप्रमाणात विदर्भवासियांना या अधिवेशनातून मदत करण्याचा त्यांच्य़ासाठी निर्णय घेण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. हे सरकार आल्यानंतर विदर्भात ३५ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांची घोषणा आणि मान्यता मुख्यमंत्र्यांनी दिली आहे, असही फडणवीस म्हणाले.


विरोधकांवर गुन्हे दाखल होतात, पण सत्ताधाऱ्यांना माफी…हा कुठला न्याय?; अनिल परबांचा सवाल

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -