घरमनोरंजनVideo : बाई मी पतंग उडवित होते; अमृता फडणवीसांनी लुटला पतंगबाजीचा आनंद

Video : बाई मी पतंग उडवित होते; अमृता फडणवीसांनी लुटला पतंगबाजीचा आनंद

Subscribe

मकरसंक्रांत म्हटलं की, आकाश रंगीबेरंगी पतंगांनी भरून जातं. लहानांपासून ते अगदी मोठ्यापर्यंत सर्वजण पतंग उडवण्यासाठी मकर संक्रांतीची वाट पाहत असतात. या पतंग उडवण्याचा आनंद घेण्यापासून आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस देखील स्वत:ला रोखू शकल्या नाहीत.

अमृता फडणवीस मागील काही दिवसांपासून अनेक कारणांमुळे चर्चेत आहेत. अलीकडेच त्याचं ‘मूड बना लिया’ हे गाणं रिलीज झालं. या गाण्याला तुफान प्रतिसाद मिळाला. अमृता फडणवीस यांनी पहिल्यांदाच पंजाबीमध्ये हे गाणं गायलं असून त्यात त्यांनी डान्सही केला आहे. यानंतर आता अमृता फडणवीस यांनी मकरसंक्रांतीनिमित्त सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

- Advertisement -

राज्यभरात मकर संक्रातीनिमित्त अनेक जण तिळगुळ घ्या आणि गोड-गोड बोला, म्हणत एकमेकांना प्रत्यक्षात किंवा सोशल मीडियावरून शुभेच्छा देत आहेत. तर दुसरीकडे यानिमित्ताने ठिकठिकाणी पतंग उडवताना तरुणाईचा उत्साह दिसून येत आहे. अनेक सेलिब्रिटीही मोठ्या उत्साहात, आनंदात मकरसंक्रांती सणाचा आनंद लुटत आहे. यात अमृता फडणवीसही मागे नाहीत, नुकतचं अमृता फडणवीसांनी पतंग उडवतानाचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. संक्रमण नवपर्वाचे, विकासाभिमुख महाराष्ट्राच्या उत्तुंग भरारीचे! मकरसंक्रमणाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा!”, असा कॅप्शनसह त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.

यासोबत एका व्हिडीओही त्यांनी शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्या पतंग उडवण्याचा आनंद घेताना दिसत आहे. तसेच त्यांनी पुन्हा व्हिडीओमधूनही हॅप्पी मकरसंक्रांत म्हणत तिळगुळ घ्या, गोड गोड बोला’ अशा शुभेच्छा दिल्या आहे.

- Advertisement -


सध्या सोशल मीडिया अमृता फडणवीस यांच ‘मूड बना लिया’ गाण्याची चर्चा रंगतेय. हे गाणं सोशल मीडियावर तर हिट आहेच पण त्याची राजकीय वर्तुळातही चर्चा रंगली, अनेक युजर्सनी या गाण्यावर रिल्स शेअर केल्या आहेत. काहींनी त्यांचं कौतुक केलं आहे तर काहींनी जबरदस्त ट्रोल केलं आहे. यापूर्वीही त्यांनी अनेक गाणं रिलीज झाली, अशात महिला दिनानिमित्त त्यांचं महिलांसाठी विशेष नवं गाणं रिलीज होणार आहे. त्यामुळे मूड बना लिया’प्रमाणेच त्यांच नवं गाणं चाहत्यांना आता कितपत आवडतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.


अब्दुल सत्तारांंनी आता शिष्यवृत्ती लाटल्याचा आरोप; काय आहे प्रकरण?

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -