घरमहाराष्ट्रशेतकऱ्यांसाठी खुशखबर; दिवसा १२ तास मिळणार अखंडीत वीज

शेतकऱ्यांसाठी खुशखबर; दिवसा १२ तास मिळणार अखंडीत वीज

Subscribe

 

सोलापूरः शेतकऱ्यांना दिवसा १२ तास अखंडीत वीज पुरवठा देणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर येथे जाहिर केले. ऐन ऊन्हाळ्यात वीज पुरवठा खंडीत झाल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देणारा हा निर्णय आहे.

- Advertisement -

देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजना राबविण्यात येणार आहे. कृषीवाहिन्या सोलरवर कार्यन्वित करण्यात आल्या आहेत. याद्वारे शेतकऱ्यांना दिवसा १२ तास अखंडीत वीज पुरवठा केला जाणार आहे. ही योजना राबवण्यासाठी शेतकऱ्यांकडून जमीनी भाडेतत्त्वावर घेतल्या जाणार आहेत.

- Advertisement -

सोलापुरातील भाजपा सोलापूर शहर व ग्रामीण जिल्हा संकल्प महाविजय कार्यकर्ता संमेलनात फडणवीस यांनी ही माहिती दिली. यावेळी फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. “सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे विरोधकांचे राजकारण होतं. हेच राजकारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोडीत काढलं आणि सामाजिक, आर्थिक परिवर्तनाची लढाई ही देशाचे पंतप्रधान म्हणून लढली जाऊ शकते, तसेच, सामान्यांच्या जीवनात बदल घडवला जाऊ शकतो. हे गेल्या नऊ वर्षांमध्ये मोदींनी दाखवून दिले.

ज्यांची दुकानं बंद होत आहेत, ते सर्व विरोधक एकत्र येऊन पंतप्रधान मोदींवर टीका करत आहेत. “पण हे कितीही एकत्र आले तरी काहीही परिणाम होणार नाही. या लोकांनी 2019 मध्ये करून पाहिलं. वेगवेगळ्या राज्यांमध्ये करून पाहिलं. पण जनता मोदी आणि भाजपाच्या पाठीशी आहे. लोकसभा असो किंवा विधानसभा जनता भाजपालाच समर्थन देणार आहे, असा टोला फडणवीस यांनी लगावला.

“मी आज प्रधानमंत्री आवास योजना आणि हर घर नल योजनेचा आढावा घेतला. त्यावेळी 70 ते 75 वर्षांनंतर सर्वसामान्य माणसांचा विचार करणारे सरकार आले, असे वाटले. हर घल नल योजनेच्या माध्यमातून 75 हजार लोकांच्या घरी जल पोहोचत आहे. म्हणजे ही 75 हजार घरं, 75 वर्षांनंतरही पाण्यापासून वंचित होते. या सोलापूर जिल्ह्यातील त्यांच्याकडे पाणी नव्हते. मात्र त्यांच्यापर्यंत आता पंतप्रधान मोदींच्या माध्यमातून पाणी पोहोचत आहे. त्यामुळे परिवर्तन हे मुठभर लोकांचे नाही तर, सर्वसामान्यांचे व्हायला पाहिजे या विचारातून पंतप्रधान नरेंद्र मोदी काम करत आहेत”, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -