घरठाणेConversion Case : धक्कादायक! मुंब्र्यात 400 जणांचं धर्मांतर? डीसीपींची माहिती

Conversion Case : धक्कादायक! मुंब्र्यात 400 जणांचं धर्मांतर? डीसीपींची माहिती

Subscribe

उत्तर प्रदेशमधील गाझियाबादमध्ये मोबाइलमधील ऑनलाइन गेमिंगच्या माध्यमातून धर्मांतर करण्यात आलंय. परंतु या धर्मांतराला महाराष्ट्र कनेक्शन असल्याचं सांगितलं जातंय. राज्यातील मुंब्र्यातही 400 जणांचं धर्मांतर करण्यात आल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. डीसीपी निपुण अग्रवाल यांनी याबाबत माहिती दिली आहे.

ऑनलाइन धर्मांतर करणाऱ्या मुख्य आरोपीनं गौप्यस्फोट केल्याचं डीसीपी निपुण अग्रवाल यांनी सांगितलं आहे. मोबाईल गेमच्या आडून ब्रेन वॉश करत धर्मांतर करण्यात आल्याची माहिती आहे. या प्रकरणी मुख्य आरोपीची चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

मुंब्य्रात 400 जणांचं धर्मांतर करण्यात आल्याचं आरोपीने आपल्या जबाबात म्हटलं आहे. तसेच या प्रकरणाचा पोलीस तपास सुरु आहे. ऑनलाइन गेमिंगचा वापर करुन ब्रेन वॉश करत धर्मांतर केलं जात असल्याचे डीसीपी अग्रवाल यांनी सांगितले आहे.

धर्मांतर कसं होतं?

उत्तर प्रदेश पोलिसांनी हा प्रकार उघडकीस आणला आहे. यामध्ये एका मोठ्या टोळीचा समावेश असून ही टोळी ऑनलाइन गेम खेळणाऱ्या मुलांना हेरते. सुरुवातीला या खेळात मुलांना हरवलं जातं. मग त्यामध्ये फसवलं जातं आणि पुढे त्यांचा धर्मांतराच्या उद्देशाने ब्रेन वॉश केला जातो. त्यामुळे ही मुलं ऑनलाइन गेमच्या माध्यमातून धर्मांतराचे शिकार होतात.

- Advertisement -

दिल्लीच्या गाझियाबादमध्ये असाच एक प्रकार घडला होता. ऑनलाइन गेमच्या सहाय्याने दोन अल्पवयीन मुलांचं धर्मांतर करण्यात आलं होतं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही मुस्लिम मुलं गैर-मुस्लिम नावाने प्रोफाइल बनवून गेम खेळायची. ही टोळी गेम खेळणाऱ्यांना हरवायची आणि त्यांना कुराण पठण करायला लावायची. त्यानंतर जाणूनबूजून जिंकवायची.

जी मुलं कुराण वाचायची त्यांना धर्मांतर करणाऱ्या टोळीतील सदस्य प्रोत्साहन देण्यासाठी खेळात हरायचे. हिंदू आयडी तयार करुन कुराणात रस दाखवणाऱ्यांचा ब्रेनवॉश करायचे. त्यांना इस्लामिक साहित्य आणि पैशांचं आमिष दाखवलं जायचं. त्यानंतर त्याच संधीचा फायदा घेत त्यांचं धर्मांतर केलं जायचं.


हेही वाचा : कुस्तीपटूंचे आंदोलन तूर्तास स्थगित, ‘या’ तारखेपर्यंत दिली मुदत; अन्यथा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -