रतन टाटांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; डि-लीट पदवीनं होणार सन्मानित

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने ह्या प्रस्तावाला मंजुरी दिली असून लवकरच हैदराबाद सिंध नॅशनल कॉलेजिएट क्लस्टर युनिव्हर्सिटी, मुंबई तर्फे पदमविभूषण रतन टाटा ह्यांना डी-लिट पदवी प्रदान करण्यात येणार

De-lit degree will be awarded to Ratan Tata

हैदराबाद सिंध नॅशनल कॉलेजिएट क्लस्टर युनिव्हर्सिटी, मुंबई ह्यांनी प्रसिद्ध उद्योजक, टाटा समूहाचे सर्वेसर्वा, पदमविभूषण  रतन टाटा ( Ratan Tata) ह्यांना डी-लिट ( de-litt degree)  ही पदवी देण्याची परवानगी मिळण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता.  रतन टाटा ह्यांचे आपल्या राज्यासह आपल्या देशातील सामाजिक, औद्योगिक व इतर अनेक क्षेत्रातील बहुमूल्य योगदान पाहता राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री  उदय सामंत (Uday Samant) यांनी हा प्रस्ताव क्षणाचाही विलंब न करता तातडीने मंजूर करण्याचा महत्वाचा निर्णय घेत सदर प्रस्तावाला तात्काळ मंजुरी देखील दिली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने ह्या प्रस्तावाला मंजुरी दिली असून लवकरच हैदराबाद सिंध नॅशनल कॉलेजिएट क्लस्टर युनिव्हर्सिटी, मुंबई तर्फे पदमविभूषण रतन टाटा ह्यांना डी-लिट पदवी प्रदान करण्यात येणार असून  रतन टाटा यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे.