अखेर सत्य समोर आलं! ‘त्या’ सात जणांची हत्याच; पोलिसांची माहिती

पुण्यातील दौंड तालुक्यातील पारगावमधील भीमा नदीत एकाच कुटुंबातील सात जणांचे मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना घडली. एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाल्याने ही आत्महत्या आहे की घातपात? याचा तपास पोलीस करत आहेत.

dead body

पुण्यातील दौंड तालुक्यातील पारगावमधील भीमा नदीत एकाच कुटुंबातील सात जणांचे मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना घडली. एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाल्याने ही आत्महत्या आहे की घातपात? याचा तपास पोलीस करत आहेत. अशातच एक धक्कादायक बाब समोर आली आहे. या सात जणांची आत्महत्य नसून हत्या असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेने संपूर्ण पुणे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. (Dead Bodies Of 7 Members Of One Family Found In Bhima River Ahmednagar)

हत्या कशी झाली?

मिळालेल्या माहितीनुसार, मोहन पवार त्यांच्या कुटूंबासह भीमा नदीत सापडले. त्यांचाच एक मुलगा अमोल पवार त्याच्या एका चुलत भावाबरोबर ज्याचे नाव धनंजय पवार आहे तो गेल्या तीन महिन्यापूर्वी, पेरणी फाटा येथे गेला होता. तो परतताना त्यांचा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये धनंजय पवारचा मृत्यू झाला. परंतु धनंजय पवार यांच्या घरच्यांना संशय आहे की, या सर्व कुटूंबांनी मिळून याच्यावर करणी केली. त्याच्यातून हत्या झाली. त्यामुळे धनंजय पवार यांच्या कुटूंबाने कट रचला. मोहन पवार यांच्या कुटूंबाला परत आणलं. आणि त्यानंतर रात्री जवळपास साडेबारा एकवाजेच्या सुमारास यांना गळा दाबून मारण्यात आलं. त्यानंतर भीमा नदीत फेकण्यात आलं. इतकेच नव्हे तर त्यामध्ये तीन मुलं देखील आहेत. झोपलेल्या अवस्थेतच ७ जणांची हत्या करण्यात आली.

पोलिसांच्या माहितीनुसार, कौटुंबिक वादातुन हत्या झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

मृतांची नावं

मोहन उत्तर पवार (वय, ५०) आणि संगीता मोहन पवार (वय, ४५) त्यांची मुलगी राणी शामराव फुलवरे (वय, २७ वर्ष) जावई शामराव पंडित फुलवरे आणि नातू मुले रितेश फुलवरे (वय,७ वर्ष), छोटू फुलवरे (वय, ५ वर्ष) आणि कृष्णा फुलवरे (वय, ३ वर्ष) यांचे मृतदेह भीमा नदीपात्रात आढळून आले आहेत. या सर्व मृतदेहांची ओळख पटवण्यास पोलिसांना यश आले आहे.


हेही वाचा – पुणे हादरलं! भीमा नदीत एकाच कुटुंबातील सात जणांची आत्महत्या