पालघरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. एका खासगी हॉस्पिटलमध्ये बकायदेशीर गर्भपात करण्यात आल्याचे उजेडात आले आहे. गर्भपात करुन अर्भकाला फेकून देण्यासाठी एका व्यक्तिकडे दिले होते. मात्र एका जागरुक नागरिकांच्या लक्षात ही गोअट आली. त्यानंतर या व्यक्तीने सदर माहिती पोलिसांना दिली. पालघर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृत अर्भकाला ताब्यात घेतले. सध्या पालघर ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांच्या उपस्थितीत पोलीस पंचनामा करत आहेत. दरम्यान, पालघर पोलिसांकडून याघटनेचा तपास सुरु आहे. नेमका कोणत्या कारणास्तव गर्भपात करण्यात आला आणि या बाळाचे आई – बाप कोण याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.
धक्कादायक: बेकायदेशीर गर्भपात करुन अर्भक फेकून देण्याचा प्रयत्न
written By My Mahanagar Team
Palghar
सध्या पालघर ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांच्या उपस्थितीत पोलीस पंचनामा करत आहेत. दरम्यान, पालघर पोलिसांकडून याघटनेचा तपास सुरु आहे.
संबंधित लेख
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -