घरमहाराष्ट्रनगरपालिकांच्या प्रारूप प्रभाग रचनेवरील हरकतींसाठी १४ मे पर्यंत मुदत

नगरपालिकांच्या प्रारूप प्रभाग रचनेवरील हरकतींसाठी १४ मे पर्यंत मुदत

Subscribe

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची कार्यवाही १० मार्च २०२२ रोजी असलेल्या टप्प्यांपासून पुढे सुरू करावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने ही कार्यवाही सुरू केली आहे.

राज्यातील २१६  नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर  १० ते १४ मे २०२२ या कालावधीत हरकती आणि सूचना दाखल करता येतील, असे राज्य निवडणूक आयोगाकडून शुक्रवारी  जाहीर करण्यात आले.  सुनावणीनंतर अंतिम प्रभाग रचना ७ जून २०२२ पर्यंत प्रसिद्ध करण्यात येईल, असेही आयोगाने स्पष्ट  केले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची कार्यवाही १० मार्च २०२२ रोजी असलेल्या टप्प्यांपासून पुढे सुरू करावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने ही कार्यवाही सुरू केली आहे. यात २०८ नगरपरिषदा आणि आठ नगरपंचायतींचा समावेश आहे.

- Advertisement -

त्यांच्या प्रारूप प्रभाग रचनेवर १० ते १४ मे २०२२ या कालावधीत हरकती आणि सूचना दाखल करता येतील. त्यावर जिल्हाधिकारी २३ मे २०२२ पर्यंत सुनावणी देतील. प्रभाग रचनेचे प्रारूप १० मार्च २०२२ रोजीच प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यावेळी प्राप्त झालेल्या आणि आता नव्याने प्राप्त होणाऱ्या हरकती , सूचनांवर एकत्रित ही सुनावणी देण्यात येईल, अशी माहिती आयोगाने दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -