Friday, June 9, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी अनधिकृत फेरीवाल्यांकडून कारवाईसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना बेदम मारहाण; दोन जण जखमी

अनधिकृत फेरीवाल्यांकडून कारवाईसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना बेदम मारहाण; दोन जण जखमी

Subscribe

मुंबईसह राज्यभरातील अनधिकृत फेरीवाल्यांवर प्रशासनाकडून कारवाई केली जाते. मात्र या कारवाईवेळी अनधिकृत फेरीवाल्यांनी अधिकाऱ्यांना बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे. पुण्यातील ढोले पाटील रोडवर ही घटना घडली.

मुंबईसह राज्यभरातील अनधिकृत फेरीवाल्यांवर (illegals hawkers) प्रशासनाकडून कारवाई केली जाते. मात्र या कारवाईवेळी अनधिकृत फेरीवाल्यांनी अधिकाऱ्यांना बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे. पुण्यातील (Pune) ढोले पाटील रोडवर ही घटना घडली. या घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. (deadly attack by illegals hawkers as palika officers arrive for action in pune)

नेमके प्रकरण काय?

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात अनधिकृत फेरीवाले मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे पुण्यातील ढोले पाटील रोडवर नागरिकांची मोठी गर्दी होते. या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली. मात्र अनधिकृत फेरीवाल्यांनी क्षेत्रीय कार्यालयांच्या अंतर्गत अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या अतिक्रमण निरीक्षक आणि सुरक्षारक्षक यांना बेदम मारहाण केली.

हेही वाचा – शेतकऱ्यांना प्रती एकर 10 हजार देण्यात यावे; विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकरांची सरकारकडे मागणी

- Advertisement -

अनधिकृत फेरीवाल्यांनी केलेल्या या मारहाणीत अतिक्रमण निरीक्षक आणि सुरक्षारक्षक जखमी झाल्याची माहिती मिळते. या घटनेवेळी लोक मोठ्या प्रमाणात जमले होते. सध्या पोलीस पुढील तपास करत असल्याची माहिती आहे.

हेही वाचा – नुकसानग्रस्तांना तातडीने नुकसान भरपाई देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश, मंत्रिमंडळ बैठकीत घेतले ‘हे’ निर्णय

दरम्यान, पुण्यात अतिक्रमण विभागाची जोरदार कारवाई सुरू आहे. ढोले रोडवर कर्मचारी कारवाई करत होते. यावेळी फेरीवाले, छोटी दुकानवाले सुरक्षारक्षकावर धावून गेली. यावेळी धक्काबुक्की झाली. त्यानंतर मारहाण झाली. याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे.


हेही वाचा – एसटीची मागची दोन्ही चाकं निखळली आणि ३५ प्रवासी…; पुणे-नाशिक मार्गावरील थरार

- Advertisment -