मुंबई: काही आठवड्यांपू्वी ठाणे (बेकायदा मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ) आणि गेल्या तीन दिवसात नांदेड, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर. एक मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री असणाऱ्या एका राज्यात एका सरकारी रुग्णालयात फक्त ऑक्सिजन किंवा औषधांच्या तुटवड्यामुळे अनेक रुग्ण मरण पावतात याची कल्पनाही करवत नाही, मात्र याची पर्वा न करता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पालकमंत्री पदाबाबत चर्चा करण्यासाठी दिल्लीला रवाना झाले. त्यामुळे राज्यात सुरू असलेल्या मृत्यूतांडवांकडे लक्ष देण्याकरता या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना वेळ नाही, त्यामुळे असं अकार्यक्षम सरकार चालवणाऱ्या मुख्यमंत्र्यांना शरम वाटते का? असा संतप्त सवाल आता ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. (Death in the state but CM DCM Delhi visit Is the Chief Minister Eknath Shinde ashamed Aditya Thackeray s angry question)
आदित्य ठाकरे यांनी X वर पोस्ट शेअर करत राज्य सरकारला खडे बोल सुनावले आहेत. आदित्य ठाकरे म्हणाले की, ठाणे, नांदेड, छत्रपती संभाजीनगर आणि आता नागपूरमध्ये औषधांच्या तुटवड्यांअभावी असंख्या लोकांचा मृत्यू झाला, परंतु या सरकारला त्याच्याशी काहीही घेणं देणं नाही. तसंच, या राज्य सरकारच्या निर्लज्जपणामुळे व अकार्यक्षमतेमुळे नवजात बालकांचा मृत्यू होतो हे त्याहूनही अधिक वाईट आहे. हे सर्व घडत असताना मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेसाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री दिल्लीला गेले. त्यांनी अद्याप या तिन्ही शहरांना किंवा मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना भेट दिलेली नाही. मी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यांची पोलखोल केली नसती तर ते आता सुट्टीवर असते. आज ते पालक मंत्री घोषित करण्यात व्यग्र आहेत. ( ज्यासाठी 2 महिन्यांपासून संघर्ष सुरू आहे), परंतु अद्याप मृत्यू झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना भेट द्यायला यांना वेळ नाही. हे लाजिरवाणं आणि धक्कादायक आहे. तरीही मिंधे-भाजपच्या नेतृत्त्वाखालील घटनाबाह्य सरकारमधेय आहे हे आश्चर्यच आहे, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
First Thane (illegal cm’s constituency) a few weeks ago, and in the past 3 days- Nanded, Chhatrapati Sambhajinagar, Nagpur.
In a state with 1 cm (hostile and illegal), and 2 DMCs, it is unimaginable that scores of people can die in government hospitals due to lack of medicines…— Aaditya Thackeray (@AUThackeray) October 4, 2023
(हेही वाचा: “अजित पवारांच्या निर्णयाला देवेंद्र फडणवीस स्थगिती देतात”, भास्कर जाधवांची खंत )
याबाबत आधीच सूचित केलं होतं
आदित्य ठाकरे म्हणाले की, ऑगस्ट महिन्यातच राज्य सरकारला पत्र लिहून पालिका आणि सरकारी रुग्णालयांणधील परिस्थितीबद्दल विचारणा करत इशारा दिली होता. त्याची देखील आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करत आठवण करून दिली. मी 29 ऑगस्ट 2023 रोजी मुंबईतील आणि राज्यभरातील पालिका आणि सरकारी रुग्णालयांमधील परिस्थितीब्ददल लिहिलं होतं. तसंच अशा परिस्थितीबद्दल चेतावणी दिली होती. आपल्या नेतृत्त्वाखालील महाराष्ट्रविरोधी असमर्थ सरकारची लाज मुख्यमंत्र्यांना असेल का आणि आरोग्यमंत्री आणि ते स्वत: राजीनामा देणार का? असा सवालही आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.