Sunday, February 21, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र डोंबिवलीत वसाहतीच्या आगीत कामगाराचा मृत्यू

डोंबिवलीत वसाहतीच्या आगीत कामगाराचा मृत्यू

शीळ रोड उसरघर येथील दुर्दैवी घटना, आणखी एक कामगार गंभीर जखमी

Related Story

- Advertisement -

डोंबिवली पूर्वेकडील कल्याण शीळ रोड उसरघर येथे असलेल्या रुणवालच्या माय सिटी गृहप्रकल्पाच्या फेज २ मध्ये कामगारांसाठी उभारण्यात आलेल्या कामगार वसाहतीला रविवारी पहाटेच्या सुमारास अचानक आग लागली. काही क्षणात आगीने रौद्ररूप धारण केले, या वसाहतीत कामगारांसाठी १२० खोल्या उभारण्यात आल्या होत्या. या सर्व खोल्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. आग लागताच कामगारांनी जीव वाचविण्यासाठी पळ काढला. मात्र, तरीही या आगीत एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला असून एक कामगार आगीत भाजल्याने गंभीररित्या जखमी झाला.

या जखमी कामगाराला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. मृत झालेल्या कामगाराचे नाव तपण महालदार असून सुरेश कुमार असे जखमी कामगाराचे नाव आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्यांनी तातडीने धाव घेत या आगीवर नियंत्रण मिळवले असून प्राथमिक तपासणीत ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. या आगीत कामगाराच्या वसाहतीतील सर्व सामानाची राखरांगोळी झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून कामगारांनी नुकसानभरपाईची मागणी केली आहे.

- Advertisement -