घरताज्या घडामोडीआयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांचं निधन, आयुर्वेदाबद्दल जिज्ञासा निर्माण करण्यात मोठं योगदान

आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांचं निधन, आयुर्वेदाबद्दल जिज्ञासा निर्माण करण्यात मोठं योगदान

Subscribe

विविध कार्यक्रम, वाहिन्यांद्वारे आयुर्वेदाचे महत्त्व लोकांपर्यंत पोहचवण्याचा ध्यास बालाजी तांबे यांनी घेतला होता.

आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांचे वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झालं. याआधी प्रकृती खाल्यावल्याने त्यांना पुण्यातील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपारादरम्यानच त्यांचं निधन झालं आहे. त्यांच्या पश्चात पत्नी वीणा, दोन मुलं आणि नातवंड असा परिवार आहे. मंगळवारी संध्याकाळी त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. गर्भसंस्कार किंवा इतर आयुर्वेदासाठी बालाजी तांबे यांचे मोठं योगदान आहे. आयुर्वेदाबद्दल जिज्ञासा निर्माण करण्यातही मोठं योगदान तांबे यांनी दिलं आहे. श्रीगुरु बालाजी तांबे यांनी आयुर्वेद आणि योग शिक्षणाच्या माध्यमातून समाज परिवर्तन केलं आहे.

आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांनी आयुर्वेद, अध्यत्म आणि संगीतोपचार यामध्ये गेली पाच दशके प्रचार आणि प्रसार करतं मोठं योगदान दिलं आहे. सर्वसामान्यांसाठी शास्त्रशुद्ध आणि गुणवत्तापूर्ण आयुर्वेदीक औषधांचं संशोधन करुन निर्मिती करण्याचे काम त्यांनी केलं आहे. अनेक समाज घटकांना त्यांनी आयुर्वेदाशी जोडलं आहे. आयुर्वेदाचे महत्त्व केवळ भारताला नव्हे तर परदेशातील लोकांनाही पटवून दिले आहे. त्यांनी आयुर्वेदिक औषधी शास्त्र आणि आयुर्वेदिक फिजिओथेरपी यांवरही संशोधन केलं आहे.

- Advertisement -

लोणावळ्यात आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांचं आश्रम आहे. या आश्रमातून त्यांनी आयुर्वेदाची जनजागृती केली आहे. तसेच राजकीय नेते, अभिनेते, संगीत साहित्य, कला अशा विविध क्षेत्रांतील मान्यवर या आश्रमाला भेट देत असतात. विविध कार्यक्रम, वाहिन्यांद्वारे आयुर्वेदाचे महत्त्व लोकांपर्यंत पोहचवण्याचा ध्यास बालाजी तांबे यांनी घेतला होता. नव्या पिढीसाठी तांबे यांनी “गर्भसंस्कार” पुस्तकाचे लेखन केलं आहे. या पुस्तकानं वाचकांना भुरळ घातली असून आतापर्यंत इंग्रजी भाषेसह इतर ६ भाषांमध्ये पुस्तकाचं भाषांतर करण्यात आलं आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -