घरताज्या घडामोडीशरद पवारांना जीवे मारण्याच्या धमकीचा निनावी फोन; वर्षभरातील दुसरी घटना

शरद पवारांना जीवे मारण्याच्या धमकीचा निनावी फोन; वर्षभरातील दुसरी घटना

Subscribe

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याच्या धमकीचा फोन आल्याची माहिती समोर येत आहे. एका अज्ञात व्यक्तीने शरद पवार फोन करत जीवे मारण्याची धमकी दिली. मंगळवारी सकाळी शरद पवारांना निनावी फोन आल्याचे समजते.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याच्या धमकीचा फोन आल्याची माहिती समोर येत आहे. एका अज्ञात व्यक्तीने शरद पवार फोन करत जीवे मारण्याची धमकी दिली. मंगळवारी सकाळी शरद पवारांना निनावी फोन आल्याचे समजते. विशेष म्हणजे यंदाच्या वर्षात शरद पवार यांना दोन वेळा धमकीचा फोन आल आहे. त्यामुळे शरद पवारांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला जात आहे. (Death threat call to NCP Chief Sharad Pawar)

शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक येथील घरी अज्ञात व्यक्तीनं फोन करून पवार यांना जीवे मारण्याची धमकी दिली. मुंबई आकाराचे देशी बनावटीचे पिस्तुल घेऊन ठार मारणार असल्याचे सांगितले आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, फोन करणाऱ्या अज्ञात व्यक्तिनं हिंदीत धमकी दिली. बंगल्यावर तैनात असलेल्या पोलीस ऑपरेटरच्या तक्रारीवरून गावदेवी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध 294, 506(2) कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस सध्या अधिक तपास करत आहे.

- Advertisement -

वर्षभरात धमकीचा दुसरा फोन

शरद पवार यांना यंदाच्या वर्षात दुसऱ्यांदा धमकीचा फोन आला आहे. याआधी १९ सप्टेंबर २०२२ रोजी शरद पवार यांना धमकीचा फोन आला होता. शरद पवार सोलापूरच्या कुर्डूवाडीत नियोजित दौऱ्याला जाण्यापूर्वी हा फोन आला होता. त्यावेळी या दौऱ्यावर शरद पवारांनी येऊ नये, अशा आशयाचा कॉल त्यांना आला.

शरद पवार यांना कुर्डूवाडी दौऱ्यावर येऊ नका, अशा आशयाचा धमकीचा फोन आला होता. आपण कोणत्याही परिस्थितीत दौऱ्यावर जाऊ नका, कुर्डूवाडी दौरा टाळा, अशी धमकी अज्ञात व्यक्तीने शरद पवार यांना फोनवर दिली. पण धमकीला भीक घालतील ते पवार कसले. त्यांनी आपला नियोजित दौरा पूर्ण केला.


हेही वाचा –  निवडणुका होईपर्यंत चीन शांत होते की…, तवांग संघर्षाबाबत संजय राऊतांचा सवाल

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -