घरक्राइमSwati Mohol : गुंड शरद मोहोळच्या पत्नीला जीवे मारण्याची धमकी

Swati Mohol : गुंड शरद मोहोळच्या पत्नीला जीवे मारण्याची धमकी

Subscribe

शरद मोहोळच्या हत्येच्या एका महिन्यातच त्यांची पत्नी स्वाती मोहोळ यांनाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. स्वाती मोहोळ यांना काल सोमवारी (ता. 05 फेब्रुवारी) धमकीचा मॅसेज आल्याची माहिती समोर आली आहे.

पुणे : कुख्यात गुंड शरद मोहोळ याची महिन्याभरापूर्वी हत्या करण्यात आली होती. भरदिवसा शरद मोहोळला गोळ्या घालण्यात आल्या होत्या. ज्यानंतर पुण्यात एकच खळबळ उडाली. परंतु, यामुळे पुण्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला. पण आता शरद मोहोळच्या हत्येच्या एका महिन्यातच त्यांची पत्नी स्वाती मोहोळ यांनाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. स्वाती मोहोळ यांना काल सोमवारी (ता. 05 फेब्रुवारी) धमकीचा मॅसेज आल्याची माहिती समोर आली आहे. (Death threat to gangster Sharad Mohol wife Swati Mohol)

हेही वाचा… Maharashtra Politics : देवेंद्र फडणवीस ‘बेपत्ता’; उद्धव ठाकरेंच्या टीकेवर भाजपाचे जोरदार प्रत्युत्तर

- Advertisement -

पुण्यातील गुंड शरद मोहोळ याची 5 जानेवारीला दिवसाढवळ्या हत्य करण्यात आली होती. या हत्येमागे मुळशीतील गुंड विठ्ठल शेलार आणि गणेश मारणे यांचा सहभाग असल्याची माहिती पोलिसांच्या तपासात उघड झाली. परंतु, आता या हत्येच्या प्रकरणातील आरोपी असलेला मुन्ना पोळेकर याच्या नावाने अकाउंट बनवून त्यावरून स्वाती मोहोळ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मुन्ना पोळेकर यानेच आपल्या दोन साथीदारांसह शरद मोहोळला गोळ्या घातल्या होत्या. आरोपी पोळेकरच्या नावाने बनविण्यात आलेल्या अकाउंटवरून स्वाती मोहोळ यांना मॅसेज पाठविण्यात आला आहे. परंतु, ही धमकी नेमकी कोणाकडून देण्यात आली आहे? याचा तपास गुन्हे शाखेकडून करण्यात येत आहे.

शरद मोहोळ याच्या हत्येचा कट हा आधीपासूनच रचण्यात आला होता. धक्कादायक बाब म्हणजे, गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये शरद मोहोळवर हल्ला करण्यात आला होता. पण या हल्ल्यात आरोपींना यश मिळाले नव्हते. मोहोळची हत्या होण्यापूर्वी त्यांची दोन वकिलांसोबत मीटिंग झाली होती. यानंतर शरद मोहोळच्या आरोपींसोबत दोन आरोपी वकिलांची बैठक झाली होती. मुळशीमध्ये शरद मोहोळ हत्येच्या आरोपींनी गोळीबाराचा सराव केला होता. गुंड मोहोळला मारण्यासाठी प्रकाश नावाच्या एका व्यक्तीने तीन पिस्तुले आणि 11 काडतुसे खरेदी केली होती. यानंतर मुळशीमध्ये हत्येचा सवार करण्यात आल्याची माहिती तपासात समोर आली.

- Advertisement -

तर, या हत्येप्रकरणी पुणे पोलिसांनी मुख्य आरोपी मुन्ना पोळेकरसह त्याचे दोन साथीदार, पोळेकर याचा मामा नितीन कानगुडे आणि वाघ्या मारणे यांना अटक केली. त्यानंकर या हत्येचे मास्टरमाईंड विठ्ठल शेलार आणि गणेश मारणे यांना अटक करण्यात आली. पोलीस आता गणेश मारणेची चौकशी करत आहेत. गणेश मारणे याला नाशिकमधून अटक करण्यात आली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -