पुण्यातील मनसे नेते वसंत मोरे यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी

पुण्यातील मनसे नेते वसंत मोरे यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. रुपेश वसंत मोरे असे त्याचे नाव असून, Whats Appच्या माध्यमातून त्याला धमकी देण्यात आली आहे.

Vasant More commented on the threat to his son

पुण्यातील मनसे नेते वसंत मोरे यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. रुपेश वसंत मोरे असे त्याचे नाव असून, Whats Appच्या माध्यमातून त्याला धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांनी पुढील तपासाला सुरूवात केली आहे. (Death threat to son of MNS leader Vasant More in Pune)

मिळालेल्या माहितीनुसार, बनावट विवाह प्रमाणपत्र बनवून 30 लाखांची खंडणी मागितली. तसेच, खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या धमकीनंतर वसंत मोरे यांनी भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

नेमके प्रकरण काय?

Whats Appवर एका मेसेजच्या माध्यमातून वसंत मोरे यांचा मुलगा रुपेश मोरे याला धमकी देण्यात आली आहे. या मेसेजमध्ये रुपेश याच्या विवाहाची बनावट प्रमाणपत्र असून, 30 लाखांची खंडणी मागण्यात आली आहे. तसेच, खंडणी न दिल्यास हे विवाहाचे प्रमाणपत्र व्हायरल करीन तसेच, गोळी झाडून हत्या करीन, अशी धमकी देण्यात आली आहे.

दरम्यान, रुपेश वसंत मोरे याला धमकी देणाऱ्याचे नाव अद्याप समजलेले नाही. परंतु, वसंत मोरे यांनी याप्रकरणी भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी तपासाला सुरूवात केली आहे. विशेष म्हणजे हा संपूर्ण प्रकार सायबर पोलिसांकडे गेला असून, सायबर पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.


हेही वाचा – गुजरात एटीएसची मोठी कारवाई, अरबी समुद्रात 425 कोटींचे ड्रग्ज जप्त, ५ गजाआड