घरताज्या घडामोडीडेक्कन एक्सप्रेसला मिळणार नवा लुक

डेक्कन एक्सप्रेसला मिळणार नवा लुक

Subscribe

मुंबई पुणे हा डेक्‍कन एक्सप्रेसचा प्रवास आणखी सुखकर आणि अधिक आरामदायी होणार आहे.

मध्य रेल्वे मार्गवरील सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस – पुणे डेक्‍कन एक्सप्रेस या गाडयांचे रूप बदलणार आहे. पाच मार्च  पासून या गाडीला एलएचबी कोच  लावण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबई पुणे हा डेक्‍कन एक्सप्रेसचा प्रवास आणखी सुखकर आणि अधिक आरामदायी होण़ार आहे.
छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस ते पुणे दरम्यान  धावणाऱ्या डेक्कन एक्सप्रेसला एलएचबी कोच बसविण्यात येणार आहे.  ५ मार्च २०२० पासून नव्या एलएचबी डब्ब्यांसह या एक्सप्रेस चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.  यामुळे प्रवासी सुरक्षेत वाढ आणि प्रवाशांना आणखी आरामदायी प्रवास मिळण शक्य होणार आहे.  11007/11008 छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस–पुणे- छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस डेक्‍कन एक्सप्रेसच्‍या १७  डब्यायची आहे. या  गाडीला  नव्या एलएचबी डब्ब्यासह चालविण्यात येणार आहे. यामध्ये  त्याधुनिक शौचालये, आरामदायक आसन उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. त्यानंतर ५ मार्चपासून  कायमस्वरूपी एलएचबी डब्ब्यासह धावणार आहे. ही डेक्‍कन एक्सप्रेस स्वरुप  वातानुकूलित चेअर कार २  डब्बे, द्वितीय आसन श्रेणी – 12 डब्‍बे, जनरेटर व्‍हॅनचे  2  डब्बा असणार आहे.

असे आहेत नवीन बदल

आरामदायक कुशन आसन,  शौचालयात स्टेनलेस स्टील फिटिंग,  मोठ्या खिडक्या,  मोठ्या सामानासाठी वेगळा रॅक,  एसी कोचमध्ये सर्व  आसनवर वाचनासाठी लॅम्प,  सर्व  आसनला फुट रेस्टची सुविधा
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -