घरताज्या घडामोडीकोरोनामुळे भांडवली मूल्य सुधारित न करण्याचा निर्णय

कोरोनामुळे भांडवली मूल्य सुधारित न करण्याचा निर्णय

Subscribe

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात कोणत्याही इमारतीचे भांडवली मूल्य सुधारित न करण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या निर्णयाला कोरोनाच्या परिस्थितीचे कारण देण्यात आले असले तरी प्रत्यक्षात महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सरकारने मुंबईकरांना दिलासा दिला आहे. कोरोना विषाणुमुळे उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या विविध अडचणींमुळे भांडवली मूल्य सुधारित करण्यास सन २०२१-२२ साठी सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही सवलत दिल्याने मुंबई महानगरपालिकेचा अंदाजे १ हजार ४२ कोटी रुपये इतका महसूल तोटा होणार आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता जागतिक महामारीने लागू केलेल्या टाळेबंदीमुळे तसेच सदर रोगाच्या भितीमुळे अनेक लहानमोठे उद्योगधंदे, शैक्षणिक संस्था, विकासाची कामे, कारखाने, बहुतांशी औद्योगिक क्षेत्रे, दैंनंदिन रोजगार बंद झाल्यामुळे सर्व प्रकारच्या आर्थिक व्यवहारांवर विपरित परिणाम झाला आहे. त्यामुळे बहुतांशी मालमत्ताधारक, संस्था,लोकप्रतिनिधी यांनीमालमत्ता कर माफ करणे किंवा सवलत देण्याबाबत महानगरपालिकेकडे मागणी केली होती. त्यानुसार मंत्रिमंडळाने आज हा निर्णय घेतला.

- Advertisement -

हेही वाचा – राज्यात दोन लाख किलोमीटरचे शेत पाणंद रस्ते बांधणार

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -