घरमहाराष्ट्रपुढील २ ते ४ दिवसांमध्ये मंत्रिमंडळ विस्तारावर निर्णय

पुढील २ ते ४ दिवसांमध्ये मंत्रिमंडळ विस्तारावर निर्णय

Subscribe

दीपक केसरकर यांनी सांगितला नवा मुहूर्त

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पुढील २ ते ४ दिवसांमध्ये मागील महिनाभरापासून रखडलेल्या शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय होईल, असा नवा मुहूर्त शिंदे गटाचे प्रवक्ते आणि आमदार दीपक केसरकर यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितला.

शिंदे आणि फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. महिना उलटला तरी मंत्रिमंडळाचा विस्तार होत नसल्यामुळे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारवर टीका केली. या टीकेला प्रत्युत्तर देताना अजित पवार यांची इच्छा लवकरच पूर्ण होईल, असे दीपक केसरकर म्हणाले. मंत्रिमंडळ विस्तारावरून गैरसमज पसरवला जात आहे. पुढील २ ते ४ दिवसांमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होईल.

- Advertisement -

लवकरच राज्यपालांना भेटून मंत्रिमंडळाची माहिती दिली जाणार आहे. राज्य मंत्रिमंडळाची बुधवारी बैठक झाल्यावर विधिमंडळ कामकाज समितीची बैठक होईल. याचाच अर्थ पावसाळी अधिवेशन पुढील आठवड्यात घेण्यासंदर्भात राज्य सरकारचे हे स्पष्ट संकेत आहेत. जर राज्य सरकार असे नियोजन करत असेल, तर त्या आधी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तारही होणार हेदेखील स्पष्ट आहे. जेणेकरून नव्या मंत्र्यांना त्यांच्या खात्याचा अभ्यास करून विधिमंडळात येता येईल आणि विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरेही देता येतील, असेही दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -