Sunday, February 28, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी स्थायी समिती: भाजपची ज्येष्ठांना चाल; सेनेचे पत्ते झाकलेलेच

स्थायी समिती: भाजपची ज्येष्ठांना चाल; सेनेचे पत्ते झाकलेलेच

मलाईदार स्थायी समिसाठी इच्छुकांची मोर्चेबांधणी; बुधवारी विशेष महासभेत होणार नवीन सदस्यांच्या नियुक्त्या

Related Story

- Advertisement -

स्थायी समिती सदस्य नियुक्तीची प्रक्रिया बुधवारी (दि. २४) सकाळी ११ वाजता विशेष महासभेत होणार आहे. या मलाईदार समितीत ‘वर्णी लागावी’ म्हणून अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. महत्वाचे म्हणजे पुढील वर्षी महापालिकेची पंचवार्षिक निवडणूक असल्याने विकास कामांच्या दृष्टीने भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच बघायला मिळत आहे. किंगमेकर ठरणार्‍या मनसेने सलिम शेख यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचे सूत्रांकडून समजते. दुसरीकडे भाजपने ज्येष्ठांना पुढे करीत प्रत्यक्षात स्थायीचा रिमोट मावळते सभापती गणेश गिते यांच्याकडेच ठेवण्याची रणनिती आखल्याचे कळते. शिवसेनेने आपल्या सदस्यांचे पत्ते अजूनही झाकलेलेच आहेत.

भाजपचा एक सदस्य कमी करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिल्यामुळे एका सदस्यासह रिक्त होणार्‍या आठ सदस्यांच्या नियुक्तीसाठी बुधवारी महापौर सतीश कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली महासभा पार पडणार आहे.या महासभेत सदस्यांची नावे जाहीर केली जाणार आहेत. भाजपाच्या कोट्यातून स्थायी समितीवरदोन वर्षासाठी नियुक्त केलेल्या वर्षा भालेराव, सुप्रिया खोडे, हेमंत शेट्टी व राकेश दोंदे यांपैकी एका सदस्याचा राजीनामा घेवून शिवसेनेच्या ज्योती खोले यांची नियुक्ती केली जाणार आहे. तर उर्वरीत पाच सदस्यांसाठी मात्र रस्सीखेच आहे. त्यात, इंदुबाई नागरे, दिनकर आढाव, भगवान दोंदे, सुमन भालेराव, दीपाली कुलकर्णी, माधुरी बोलकर, प्रतिभा पवार, प्रियंका माने, शशीकांत जाधव, अर्चना थोरात, मच्छिंद्र सानप, अंबादास पगारे, चंद्रकांत खोडे यांच्यासह विदमान स्थायी समिती सभापती गणेश गिते यांच्या नावांची चर्चा आहे. तर शिवसेनेकडून उर्वरीत दोन नावांसाठी शिवसेना गटनेता विलास शिंदे, सुवर्णा मटाले पुनम दिंगबर मोगरे, केशव पोरजे, संतोंष गायकवाड, यांच्या नावांची चर्चा आहे. महासभे आधीच शिवसेनेकडून नावे अंतिम केले जाणार असल्याचे समजते.
किंगमेकर सलिम शेख?
मनसेकडून सदस्यपदावर जाण्यासाठी तीन अ‍ॅड,वैशाली भोसले, योगेश शेवरे आणि गटनेता नंदीनी बोडके यांचे नाव होते. पक्षनिरिक्षक शिरीष सावंत यांनी मंगळवारी नगरसेवकाशी चर्चा केली.त्यानंतर सलिम शेख यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे समजते.

- Advertisement -