घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रइस्कॉन मंदिरात गोपाष्टमीनिमित्त विग्रहांची सजावट

इस्कॉन मंदिरात गोपाष्टमीनिमित्त विग्रहांची सजावट

Subscribe

नाशिक : इस्कॉन मंदिरात गोपाष्टमीचा व गोवर्धन पूजेचा उत्साह अंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन) नाशिकच्या वतीने बुधवारी (दि.२) गोपाष्टमी महोत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला. गोपाष्टमीनिमित्त विग्रहांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. राधारणी, ललिता सखी व विशाखा सखी यांनी गोपवेष परिधान केला होता. सर्व भाविकांनी दामोदर अष्टकं गात राधा दामोदर यांना दिवा अर्पण करून पूजा केली. त्यानंतर भाविकांनी गोवर्धन शिळेची परिक्रमा केली. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

- Advertisement -

गोपाष्टमी महोत्सवाला बुधवारी सकाळी ५ वाजता मंगल आरतीपासून सुरुवात झाली. त्यानंतर हरे कृष्ण महामंत्रा जप, दर्शन आरती, श्रीमद्भागवत प्रवचन झाले. सायंकाळी मंदिराचे अध्यक्ष कृष्णधन प्रभूंचे प्रवचन झाले. कृष्णधन प्रभू म्हणाले की, वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत गोपाळकृष्ण गोवत्साचे पालन करत असे. गोपाळकृष्णाच्या वयाच्या सहाव्या वर्षी नंद महाराज व इतर वरिष्ठ गोपींनी कृष्णाला आता गोचरण करण्याची जबाबदारी देण्यात यावी असा निर्णय घेतला. गोचरण करण्यासाठी मुहूर्त बघण्यात आला व तो दिवस कार्तिक शुक्ल अष्टमीचा होता. त्या दिवशी माता यशोदेने कृष्णाला सजवले व जेव्हा पायात चपला घालण्यासाठी दिल्या तेव्हा कृष्ण मातेला म्हणाले की जर तू सर्व गायींना चपला देणार असशील तरच मी चपला घालेन, नाहीतर मी देखील घालणार नाही. कृष्ण अनवाणीच गोचरणासाठी गेले. सर्व गायींनी आपल्या खुरांनी वृंदावनातील माती तुडवून मऊ केली. जेणेकरून कृष्णाच्या चरणांना इजा होणार नाही. कार्तिक महिन्यात वृंदावनाचे व तेथे झालेल्या कृष्ण लिलांचे स्मरण स्मरण केल्याने व्यक्ति पवित्र होतो. गोपाष्टमीच्या दिवशी श्री कृष्णाने आपले गायींवरील प्रेम व्यक्त केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -