घरताज्या घडामोडीडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर डीप-क्लीन ड्राइव्ह

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर डीप-क्लीन ड्राइव्ह

Subscribe

दरवर्षी 6 डिसेंबर रोजी म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यभरात अनेक अनुयायी शिवाजी पार्क येथील चैत्यभूमीला भेट देतात. या अनुयायांची गैरसोय होऊ नये यासाठी राज्य सरकारवर व महापालिका प्रशासनाकडून अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या सुविधांचा आढावा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला.

दरवर्षी 6 डिसेंबर रोजी म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यभरात अनेक अनुयायी शिवाजी पार्क येथील चैत्यभूमीला भेट देतात. या अनुयायांची गैरसोय होऊ नये यासाठी राज्य सरकारवर व महापालिका प्रशासनाकडून अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या सुविधांचा आढावा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. तसेच, या सुविधांचा आढावा घेत असतानाच चैत्यभूमी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली डीप-क्लीन ड्राईव्हही करण्यात आले. यावेळी डीप-क्लिनी ड्राइव्ह हे मुंबईच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. (Deep Clean drive at Chaityabhoomi on Mahaparinirvana Day of Dr Babasaheb Ambedkar)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक डॉ. बाबासाहेबांचे अनुयायी मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. महापरिनिर्वाण दिन हा 6 डिसेंबर रोजी असला तरी, त्यापूर्वीच अनेक अनुयायी दादरच्या शिवाजी पार्क मैदानात दाखल झाले आहेत. या अनुयायींसाठी करण्यात आलेल्या सुविधांचाच आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा घेतला. यावेळी ‘6 डिसेंबरला बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे. यावेळी अनुयायांना कोणत्याही अडचणी येऊ नयेत म्हणून सरकार, पालिका आणि बाबासाहेबांचे अनुयायी तयारी करत आहेत’, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

- Advertisement -

‘मुंबई स्वच्छ, सुंदर व निरोगी ठेवण्यासाठी डीप-क्लिन ड्राइव्ह अत्यंत महत्त्वाचे आहे. अतिशय चांगली संकल्पना असून मुंबईत सुरू झाली आहे. मुंबईतील झोपडपट्ट्या, सोसायट्या, वसाहती आणि रस्ते स्वच्छ झाले पाहिजेत. या पार्श्वभूमीवर डीप-क्लिन ड्राइव्ह सुरू झाले आहे’, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

शिवाय, चैत्यभूमी कमिटी आणि पालिका प्रशासनासोबत बैठक झाल्याचंही मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितले. तसेच, ‘सगळा आढावा घेतला असून अनुयायांना सर्व सुविधा पुरवल्या जातील 6 डिसेंबरला कोणतीच गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जाईल’ असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

- Advertisement -

दरम्यान, या आढाव्यानंतर देशात पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सुरू असून याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ‘महायुतीला अनुकूल निकाल येतील थोडावेळ वाट पाहू चित्र स्पष्ट होईल. लगेचच अनुमान काढता येणार नाही महायुतीला अनुकूल असाच निकाल येईल’, असे उत्तर शिंदेंनी दिले.


हेही वाचा – SANJAY RAUT : पाच राज्यांमधील विजयाचा दावा हा मोठा विनोद, संजय राऊतांचा भाजपाला टोला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -