घरताज्या घडामोडीवर्षा बंगल्यासमोरून 10 वेळा फोन केले; पण.., दीपक केसरकरांचा आरोप

वर्षा बंगल्यासमोरून 10 वेळा फोन केले; पण.., दीपक केसरकरांचा आरोप

Subscribe

शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन संवाद साधला. यावेळी त्यांनी बंडखोरी केलेल्या आमदार आणि खासदारांवर जोरदार टीका केली होती. दरम्यान, वर्षा बंगल्याच्या रस्त्यावर उभं राहून दहा वेळा फोन केले की आतमध्ये यायचं की नाही. पण आम्हाला आत प्रवेश दिला नाही, असा आरोप शिंदे गटाचे प्रवक्ते आणि आमदार दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे.

दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेत ठाकरेंवर टीका केली आहे. भाजपला अनेक नावं ठेवण्यात आली असं तुमचं म्हणणं आहे. मग त्यांच्यासोबत तुम्ही सरकार बनवायला का तयार झालात, याचंही उत्तर महाराष्ट्राच्या जनतेला मिळायला पाहिजे. तिथे केवळ भाजप आपलं मुख्यमंत्रीपद आपल्याला देईल की नाही. हा विश्वास नसल्यामुळे ती जर युती घडली नसती. तर युती घडवायला तुम्ही तयार होतात की नाही, हे सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेला समजायला पाहिजे, असं दीपक केसरकर म्हणाले.

- Advertisement -

तुम्ही ज्यावेळी भाजपसोबत मंत्रिमंडळ स्थापन केलं. त्यावेळी तुम्ही बोलणी केलीत का?, माझ्या माहितीप्रमाणे बोलणी झालेली नाही. तुम्ही त्यांचे फोन सुद्धा स्वीकारलेले नाहीत. वर्षा बंगल्याच्या रस्त्यावर उभं राहून दहा वेळा फोन केले की आतमध्ये यायचं की नाही. पण आम्हाला आत प्रवेश दिला नाही. ही किंमत असते का लोकप्रतिनिधींची?, असा सवाल दीपक केसरकर यांनी उपस्थित केला.

20 आमदार गेल्यानंतरही 20 आमदार तुम्हाला पक्ष वाचवू हे सांगायला आले होते. परंतु, त्यावेळी तुम्ही म्हणालात की तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही देखील जा. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद देण्याचं आशावासन दिलं होतं की नाही? बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी शब्द पाळला असता, असं केसरकर म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : नोबेल पारितोषिक 2022: तीन अर्थशास्त्रज्ञांना मिळालं अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -