घरताज्या घडामोडीठाकरेंनीच शिंदेंना मुख्यमंत्रीपदाचं आश्वासन दिलं होतं, दीपक केसरकरांकडून पुनरुच्चार

ठाकरेंनीच शिंदेंना मुख्यमंत्रीपदाचं आश्वासन दिलं होतं, दीपक केसरकरांकडून पुनरुच्चार

Subscribe

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांचं बोलणं सुरू होतं. १२ आमदारांना निलंबन केल्यानंतर हे बोलणं थांबलं. ही बाब खरी आहे का?, हे तीन प्रश्न मी विचारले होते. परंतु तिन्ही प्रश्नांपैकी एकाचही उत्तर ते देऊ शकलेले नाहीत. हे महाराष्ट्रातील जनतेने आणि शिवसैनिकांनी लक्षात घेतलं पाहीजे. आज ज्या तुमच्या भावना भडकावल्या जात आहेत. त्या कितपत योग्य आहेत, याचा विचार करा. जो तुमचा मनुष्य मुख्यमंत्री झाला आहे. त्याला तुमच्या पक्षप्रमुखांनीच आश्वासन दिलं होतं की, तुम्हाला मी मुख्यमंत्री करतो, असं शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर म्हणाले.

ठाकरेंनीच शिंदेंना मुख्यमंत्रीपदाचं आश्वासन दिलं होतं

दीपक केसरकर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, जो तुमचा मनुष्य मुख्यमंत्री झाला आहे. त्याला तुमच्या पक्षप्रमुखांनीच आश्वासन दिलं होतं की, तुम्हाला मी मुख्यमंत्री करतो. बाळासाहेबांनी दिलेले आश्वासन ते कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करायचे. इतर आश्वासन पूर्ण केलं नसल्यामुळे ते स्वत: तुमच्याकडे आले. तुम्हीच मुख्यमंत्री रहा असं त्यांनी तुम्हाला सांगितलं. परंतु आम्हाला हिंदुत्वासोबत जायचंय असं सांगितल्यावर तुम्ही का ऐकलं नाहीत. हा सुद्धा एक प्रश्न आहे.

- Advertisement -

…त्यापदावरून खाली उतरावं लागलं असतं

जर मोदींसोबत आपलं बोलणं सुरू होतं. तरीसुद्धा तुम्हाला त्यापदावरून पायउतार व्हावचं लागलं असतं. अडीच-अडीच वर्षाचा जरी तुमचा फॉर्म्यूला असता आणि अडीच वर्ष जरी झाली असती तरी तुम्हाला त्यापदावरून खाली उतरावं लागलं असतं. त्या केसमध्ये तुम्ही जनतेच्या भावना अशा प्रकारे भडकावल्या असता का, हा मुळात प्रश्न आहे, असं दीपक केसरकर म्हणाले.

रोज सकाळी कोण बोलतं हे संपूर्ण महाराष्ट्राला माहितीये

शेवटी या राज्याला शांतता पाहीजे. ही शांतता लोकांना आणि राज्याला समृद्धीकडे घेऊन जाणार आहे. राज्याला शांतता द्यायची की नाही, याचा सुद्धा विचार केला पाहीजे. २०१४ साली आमचं सरकार स्थापन झाल्यानंतर रोज सकाळी एक पत्रकार परिषद असायची. रोज दिल्लीवर टीका केली जायची. रोज सकाळी नऊ वाजता कोण बोलतं हे संपूर्ण महाराष्ट्राला माहितीये. ते बोलत असताना ज्या पक्षासोबत आपण राज्य करतो. त्यांच्यासोबत आपले चांगले संबंध राहीले पाहीजे. केंद्र आणि राज्याचे संबंध चांगले राहीले पाहीजे. त्यामुळे राज्याचा गाडा चांगला राहू शकतो. लोकांनाही मोठा दिलासा मिळू शकतो. राज्य आणि राजकीय पक्ष हे जनतेसाठी असतात. कधीतरी राज्य आणि प्रगतीबद्दल बोला?, कितीकाळ राजकारण चाललं पाहीजे, याला सुद्धा मर्यादा आहेत, असा टोला दीपक केसरकर यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना लगावला.

- Advertisement -

आघाडी तोडण्यामागे कटकारस्थान होतं का?

प्रवक्त्यांच्या बोलण्यामध्ये जी सुधारणा झाली होती. ते पुन्हा एकदा घसरायला लागले आहेत. लोकांना रडवायचं कसं हे तुम्हाला माहितीये. ज्यावेळी पक्षप्रमुख आजारी होते. त्यावेळी कटकारस्थान करण्यात आलं असं तुम्ही सांगू शकता. हे कटकारस्थान झालेलंच नव्हतं. हे महाराष्ट्राच्या जनतेला कळलं पाहीजे. आघाडी तोडण्यामागे काही कटकारस्थान होतं का, शिवसेना वाचली पाहीजे, यासाठी ही आघाडी बनता कामा नये, असं दीपक केसरकर म्हणाले.


हेही वाचा : रावसाहेब दानवे अन् अर्जुन खोतकरांमध्ये दिलजमाई, शिंदेंनी घडवला समेट


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -